आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अनोखा निषेध हम चले अण्णा को जगाने; बार्शी काँग्रेसतर्फे अण्णा हजारेंच्या वाढदिवशी निषेध

बार्शी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील युवक काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. विविध सामाजिक प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी आयोजित केलेल्या अनोख्या आंदोलनात अण्णा हजारे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची स्थापना करून ‘हम चले अण्णा को जगाने’ नावाने विविध प्रश्नांवर जाब विचारला. बुधवारी दि.१५ रोजी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

अमर खानापुरे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीने ज्यांना प्रतिगांधी म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला, त्या अण्णा हजारे यांचा वाढदिवस असताना निषेध व्यक्त होत आहे. पूर्वी टीव्ही पाहून सकाळी उठल्यावर प्रत्येक जण विचारत असे की अण्णांचे उपोषण सुटले का? इतकी आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी देण्यात आली. आंदोलनाला कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रतिसाद मिळत होता, परंतु भाजपच्या सत्ताकाळात त्यांना आपल्या पाठमागे कोणीच नसल्याचे उघड झाले. ते केवळ काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र होते. झोपेचे सोंग घेतलेल्या अण्णांना जाग यावी.

जुगलकिशोर तिवाडी म्हणाले, काही प्रश्नांना घेऊन अण्णांनी रामलीला मैदानापर्यंत आंदोलने केली. आज अनेक प्रश्न उभे असतांना अण्णा गप्प का आहेत. त्यांच्या गप्प बसण्यामुळे त्यांच्याबद्दलची साशंकता निर्माण झाली ती व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...