आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनावरण:विद्यापीठाची पुस्तके विद्यार्थ्यांसह‎ वाचकांसाठीही अॅपद्वारे उपलब्ध‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी ‎ ‎ होळकर सोलापूर विद्यापीठातील ‎ ‎ पुस्तके, ग्रंथ, कथा, कादंबरी,‎ मासिके, जर्नल्स विद्यार्थ्यांबरेाबरच ‎ ‎ वाचकांसाठीही उपलब्ध झाले आहे. ‎ ‎ कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ‎ ‎ ज्ञानस्रोत केंद्रमार्फत एका अॅपद्वारे‎ याची सुविधा देण्यात आली आहे.‎ माय ई-केआरसी (My-e KRC)‎ हे मोबाइल ॲपचे नाव आहे. या‎ अॅपचे अनावरण सोमवारी कुलगुरू‎ डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या‎ हस्ते करण्यात आले.‎ डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या‎ जयंतीनिमित्त विद्यापीठात विविध‎ उपक्रम झाले. यावेळी प्र-कुलगुरू‎ डॉ. राजेश गादेवार, कवी डॉ. राजेंद्र‎ दास, कुलसचिव योगिनी घारे यांची‎ प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे‎ प्रास्ताविक केंद्राचे प्रभारी संचालक‎ डॉ. गौतम कांबळे यांनी केले.‎ सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी‎ केले तर आभार डॉ. पल्लवी सावंत‎ यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...