आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ गाफील:नियोजनाच्या परीक्षेत विद्यापीठ फेल‎

सोलापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारकडे प्रलंबित प्रमुख सहा मागण्यांसाठी‎ जिल्ह्यातील ३७ अनुदानित महाविद्यालयातील ७५०‎ शिक्षकेतर कर्मचारी बहिष्कार आंदोलनात सहभागी‎ झाले. याची पूर्वकल्पना असली तरी विद्यापीठाने‎ पर्यायी यंत्रणेचा विचार केला नाही.

त्यामुळे परीक्षा‎ अचानक रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर‎ आली. परीक्षा देण्यासाठी केंद्रावर आल्यानंतरच‎ विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याचे कळाले.‎ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर‎ विद्यापीठाच्या २३ जानेवारीपासून सुरळीत सुरू‎ होत्या. अभियांत्रिकीसह विविध पदवीच्या एकूण २२‎ अभ्यासक्रमांच्या ३१ केंद्रांवरील परीक्षा रद्द झाल्या.‎ सुमारे वीस हजार परीक्षार्थींना विद्यापीठाच्या‎ नियोजनशून्यतेचा फटका बसला.‎

परीक्षेच्या बाबतीत विद्यापीठाकडून वारंवार चुका‎
परीक्षा कामकाजात वारंवार होणाऱ्या चुका यंदा काटेकोर नियोजनाद्वारे‎ सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. मात्र, मागील वर्षी‎ चार वेळा तर या वर्षी दोन वेळा वेळापत्रकांत बदल करण्यात आला‎ होता. परीक्षा विभागाची नियोजनशून्यता असेच वर्णन सार्थ आहे.‎ मागील वर्षी ११ वेळा परीक्षा नियोजनात त्रुटी निर्माण झाल्या होत्या.‎

गेल्या ५ वर्षापासून वेळोवेळी आंदोलने‎ करूनही शासनाने आश्वासनाशिवाय‎ काहीही दिले नाही. त्यामुळे हे आंदोलन‎ होत आहे. याला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड‎ युनियन्स जाहीर पाठिंबा देत आहे. प्रशासन‎ आणि शासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षक व‎ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले .‎- अॅड. एम. एच. शेख, राज्य महासचिव, सीटू‎

केंद्रावर आल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द चे कळाले‎
काही विद्यार्थ्यांना सकाळी साडेआठला मेसेज‎ परीक्षा शहरातील १३ तर ग्रामीण भागातील १८ परीक्षा केंद्रांवर सुरू‎ होत्या. सकाळी ९ वाजता परीक्षार्थी केंद्रावर येणार होते. काही‎ विद्यार्थ्यांना सकाळी ८.३० वाजता परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज‎ मोबाइलवर आला. पण मेसेजवर विश्वास न ठेवता विद्यार्थी परीक्षा‎ केंद्रावर आले होते. तिथे खात्री पटल्यानंतर विद्यार्थ्यांची धांदल‎ उडाली. मनस्ताप झाल्याचे नमूद करीत संताप व्यक्त केला.‎ अभाविपने वालचंद महाविद्यालयापुढे निषेध घोषणा दिल्या.‎

तारखा यथावकाश कळवू
कर्मचारी बहिष्कार आंदोलनामुळे परीक्षा‎ कामकाजात अडचणी निर्माण झाल्याने त्या‎ स्थगित केल्या आहेत. सुधारित तारखा‎ यथावकाश जाहीर करण्यात येतील.”‎ डॉ. शिवकुमार गणपूर, संचालक,‎ परीक्षा व मूल्यमापन मंडळ‎

बातम्या आणखी आहेत...