आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात पर्यावरण सप्ताह:चिमण्यांसाठी घरटी बनवण्याचे प्रशिक्षण; नेचर वॉकसह पोस्टर, रांगोळी स्पर्धेचेही आयोजन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - युनिसेफ (महाराष्ट्र) तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुल आणि भूशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 ते 13 जून 2022 दरम्यान पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात यावा, असे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आले आहे. या अनुषंगाने युनिसेफ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे या पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .

पर्यावरण सप्ताहाचे उद्घाटन दिनांक 8 जून रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक शास्त्रे संकुलाच्या सभागृहात पर्यावरण तज्ञ भरत छेडा यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस असणार आहेत .

या पर्यावरण सप्ताहाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे . यामध्ये दिनांक 9 जून रोजी निबंध आणि पर्यावरण पूरक रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. दिनांक 10 जून रोजी पोस्टर स्पर्धा तसेच सोलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांसमवेत चर्चा याचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 11 जून रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या सर्व स्पर्धा दुपारी 3 ते 5 या वेळेत होणार आहेत. रविवार दिनांक 12 जून रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये विद्यापीठाच्या सध्याच्या कॅम्पसपासून नवीन कॅम्पसपर्यंत नेचर वॉक आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये विविध तज्ञ पक्षी आणि झाडांची माहिती देणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . दिनांक 13 जून 20 22 रोजी सकाळी 11 वाजता पर्यावरण सप्ताहाचा समारोप समारंभ भूशास्त्र संकुलाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विभागीय वन अधिकारी मनीषा पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत​​​​​​.

चिमण्यांसाठी घरटी बनविण्याची कार्यशाळा

पर्यावरण सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक 8 जून 2022 रोजी दुपारी बारा वाजता विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलामध्ये चिमण्यांसाठी घरटी बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेमध्ये तज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांना चिमण्यांसाठी घरटी कशी बनवावी याचे प्रशिक्षण देणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...