आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूलतज्ञांची राष्ट्रीय परिषद:नवशोध वापरा, आधुनिक सेवा द्या ; राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वेंकटगिरी यांचे आवाहन

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज नवनवीन संशाेधन हाेत असून त्याचा लाभ सुध्दा हाेत आहे. त्यामुळे भूलतज्ञ डॉक्टरांनी अद्ययावत राहून रुग्णांना सुरक्षित व वेदनारहित भूल द्यावी, असे मत अखिल भारतीय भूलतज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वेंकटगिरी यांनी केले.अखिल भारतीय भूलतज्ञ संघटना आणि साेलापूर भूलतज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल बालाजी सराेवर येथे राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले, कुठल्या रुग्णाला कुठल्या प्रकारची भूल द्यावी, रुग्णांवर कशा प्रकारची शस्त्रक्रिया हाेत आहे त्याचा अभ्यास करून भूल देणे आवश्यक आहे.

भूल व्यवस्थित दिली तरच शस्त्रक्रिया सुरक्षितपणे पार पडेल. आजच्या काळात नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहून नवनवीन संशोधनाची माहिती घ्यावी.व्यासपीठावर डॉ. वेेंकटगिरी, राष्ट्रीय सचिव डॉ. नवीन मल्होत्रा, डॉ. अंजली पुरे, डॉ. धिनेश्वर, डॉ. एस एस बाजवा, डॉ. मनीषा काटीकर, डॉ. अविनाश भाेसले, डॉ. कविता निंबर्गी, डॉ. वैशाली येमूल, डॉ. पुष्पा अग्रवाल, डॉ. साेनिया गांधी यांची प्रमुख उपस्थिती हाेती. परिषदेत भूलतज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वैशाली जोशी यांनी केले. यावेळी अनेक ठिकाणांहून भूलतज्ञ आले हाेते.

तज्ञांचे मार्गदर्शन
यावेळी डॉ. बालावेंकट, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. सुरेखा शिंंदे, डॉ. माधुरी, कुरडी, डॉ. निलेश नाफडा यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन नंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुध्दा झाला. फक्त हातावर भूल कशी द्यायची, प्रसुतीच्यावेळी अधिक रक्तस्त्राव झाले तर, लहान बाळांच्या आजारावर, हृदय शस्त्रकिया असाे किंवा कॅन्सर वरील शस्त्र क्रियेवेळी कशाप्रकारे भूल द्यावी यावर तज्ञांकडून मागर्दशन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...