आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कर्ष महोत्सवात नागपूर विद्यापीठ चॅम्पियन!:पुणे विद्यापीठास दुसरे तर सोलापूरला तिसरे बक्षीस

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून रंगलेल्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम बक्षीस 28 गुणांसह संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठास मिळाले. सर्वसाधारण विजेतेपदाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 27 गुणांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस 23 गुणांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मिळाले.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तेराव्या राज्यस्तरीय उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सोलापूर विद्यापीठ कॅम्पस येथे करण्यात आले होते.

गुरुवारी पारितोषिक वितरणाने महोत्सवाचा समारोप झाला. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सोलापूरचे जागतिक ख्यातीचे सुंदरी वादक पंडित भीमण्णा जाधव, अभय दिवाणजी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य ब्रँड अँबेसिडर (सदिच्छा दूत) प्रिया पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे हे ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.

अमरावती विद्यापीठाच्या डॉ. पूजा पानसे, जळगाव विद्यापीठाचे डॉ. प्रदीप आवसेकर पुणे विद्यापीठाची श्रुती बोरस्ते आणि मुंबईच्या एचएसएनसीचा सागर तोलनकर यांनी यावेळी आपले अनुभव कथन केले. पारितोषिक वितरण समारंभात निकालपत्राचे वाचन डॉ. दत्ता घोलप यांनी केले. गोल्डन बॉय व गोल्डन गर्लच्या मानपत्राचे वाचन प्रा. ममता बोल्ली यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर गुणवंत सरवदे यांनी आभार मानले

बातम्या आणखी आहेत...