आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधोपचार:क्षयरुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना लस

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एचआयव्हीबाधित व्यक्ती, क्षयरोग असणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, डायलिसेसवर असणारे, कॅन्सरचा औषधोपचार सुरू असणारे, अवयव प्रत्यारोपण झालेले यांना क्षयरोग होण्याची शक्यता इतर व्यक्तींपेक्षा ५ ते २० पट अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींना भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार क्षयरोग प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे. त्यांना लस देण्यात येणार आहे.

क्षयरोग्याच्या संपर्कातील सर्व वयोगटातील व्यक्तींना हा औषधोपचार देण्यात येणार आहे. औषधोपचार सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींना क्षयरोग झाला नसल्याची खात्री करण्यात येईल. क्षयरोग झालेल्या व्यक्तींना क्षयरोगाचे उपचार सुरू करण्यात येतील.

न झालेल्या व्यक्तींना सहा महिने प्रतिबंधात्मक उपचार देण्यात येणार आहे. पूर्वी क्षयरोगाचा औषधोपचार घेतलेल्या व्यक्ती नव्याने क्षयरुग्णाच्या संपर्कात आल्यास त्यांनाही हा औषधोपचार व लस मोफत देण्यात येणार आहे. मोफत प्रतिबंधात्मक औषधोपचार मिळण्यासाठी पालिका आरोग्य केंद्राकडे संपर्क साधावा. एकदा औषधोपचार सुरू केल्यानंतर सहा महिने तो अखंडितपणे घ्यावा.

बातम्या आणखी आहेत...