आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वैशाखात सुरू झाली लगीन घाई, सगळंच महागले बाई !; कोरोनानंतरच्या काळात लग्न करणे तितकेसे सोपे नाही राहिले, गर्दी, डामडौल यावर नियंत्रणही नाही राहिले

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या काळामध्ये शुभकार्याला ब्रेक लागला होता. गर्दी, डामडौल यावर बंधने आली होती. त्यामुळे कमी खर्चात शुभमंगल व्हायचे. आता कोरोनानंतरच्या काळात लग्न करणे तितकेसे सोपे राहिले नाही. कारण लग्नाशी संबंधित सर्वच गोष्टींना महागाईचा विळखा पडला आहे.

त्यामुळे लगीन घाई, सगळंच महागलं बाई.. असं म्हणायची वेळ आली आहे. जेवणापासून ते मंडपापर्यंत अन् लग्नात दिले जाणाऱ्या आहेरापासून ते बस्त्यापर्यंत... आणि रुखवतात दिल्या जाणाऱ्या भांड्यांपर्यंत सगळ्याच गोष्टींना महागाईच्या झळा लागत आहेत. कोरोना काळात शे-दोनशे लोकांत शुभमंगल व्हायचं, त्याच लग्नाला आता दोन अडीच लाख मोजावे लागत आहेत.

रुखवताचे साहित्य २० टक्क्यांनी महागले : नवरीला दिल्या जाणाऱ्या रुखवताच्या साहित्यात बैलगाडी, वेगवेगळे खाद्यपदार्थ, साहित्य, खेळणी असे दिले जातात. त्यात तब्बल २० टक्क्यांनी भाव वाढले आहेत.

इव्हेंटचे तुणतुणे जोरात : कोरोना काळानंतर इव्हेंटवाल्यांनी आपले तुणतुणे जोरात वाजवायला सुरुवात केली आहे. चकचकीत साहित्य आणि इतर गोष्टींचा वापर करून ही मंडळी सामान्य बाजारपेठेत एखादी गोष्ट १०० रुपयाला असेल तर ती सेवेससहित १५० ते १६० रुपयांत उपलब्ध करत आहेत. गरिबांची लग्नं थोडक्यात कुमठा नाका परिसर, जुळे सोलापूर आणि पूर्व भागात अगदी कमी दरात म्हणजे १०० लोकांच्या जेवणाचे नियोजन अवघ्या १५ ते ३५ हजार रुपयांत करणारी अनेक मंगल कार्यालये आहेत. सामान्य नागरिक आपल्या मुलांची लग्ने यातून करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...