आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर:दर पाच वर्षांनी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीस करावा लागणार वज्रलेप; भारतीय पुरातत्त्व विभागाचा अहवाल, आषाढीपूर्वी होणार लेपन

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन चालू ठेवायचे असेल तर ५ वर्षांतून एकदा मूर्तीला वज्रलेप करावा लागेल. त्याचबरोबर गाभाऱ्यात भिंतीला लावण्यात आलेली ग्रॅनाइट फरशी काढावी लागणार आहे. प्रासंगिक केल्या जाणाऱ्या फुलांच्या सजावटीवर नियंत्रण आणि मूर्तीशी प्रत्यक्ष पाण्याचा संपर्क कमी करावा लागेल, अशा उपाययोजना भारतीय पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, शंकुतला नडगिरे, प्रकाश महाराज जवंजाळ यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

मागील महिन्यात रुक्मिणीच्या पावलांचे लेपन निघाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आखिल श्री विठ्ठल रूक्मिणी भक्त आणि वारकऱ्यातून नाराजी व्यक्ता केली जात होती. या संदर्भात भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून मूर्तीची पाहणी करण्यात आली होती. त्या विभागाचा पाहणी अहवाल तीन दिवसांपूर्वी मंदिर समितीला प्राप्त झाला आहे.

त्यावर आज गुरुवारी मंदिर समितीच्या आषाढी यात्रा नियोजन बैठकीत चर्चा करण्यात आली. श्री. औसेकर म्हणाले, गतवर्षी जुलै महिन्यामध्ये विठ्ठलाच्या पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली वज्रलेप करण्यात आला आहे. मागील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये रुक्मिणीच्या मूर्तीस करण्यात आलेला वज्रलेप खराब होऊन त्याची झीज झाल्याचे समोर आले. काही ठिकाणी वज्रलेपाचे तुकडे निघाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत मंदिर समितीने पुरातत्त्व रसायनतज्ञ, संवर्धन संशोधन प्रयोगशाळा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण औरंगाबाद यांना कळविले होते.

पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी ७ व ८ मे रोजी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची पाहणी केली होती. त्याबाबतचा अहवाल १० मे रोजी मंदिर समितीला दिला होता.

बातम्या आणखी आहेत...