आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:आघाडीतील पक्ष शेतकऱ्यांना मदत करण्यापासून सरकारला दूर ठेवताय, आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केले वादग्रस्त वक्तव्य

सोलापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने खावटी अनुदान मधून 5 हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी

राज्यातील तीन पायाचे सरकार पैकी दोन पाय एका पायास राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यापासून दूर ठेवत आहे. पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपेक्षा साखर कारखानदारांना मदत करण्यासाठी हात आखडता घेत असल्याचा आरोप वंचीत बहुजन आघाडीचे अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयीही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

यासोबतच प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने खावटी अनुदान मधून 5 हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तीन पायांपैकी नेमका कोणता पाय दबाव टाकतो, या प्रश्नावर बोलताना आंबेडकर यांनी ज्यांच्याकडे सहकार विभाग आहे, ते असे सूचक वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधानांविषयी केले वादग्रस्त वक्तव्य
मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून दारुड्या आहे, देश विकायला निघाले आहेत. रेल्वे, विमान आदी नफ्यातील सुविधांचे खासगीकरण सुरू आहे. गरज भागली नाही म्हणून विक्रीला काढत असल्याप्रणाने आहे. ज्याप्रमाणे एखादा दारुडा दारु पिण्यासाठी बायकोला मारतो नंतर दारुसाठी घर विकतो त्याप्रमाणे मोदी आहेत. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

5 हजार तात्काळ मदत करावी
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी टोलवाटोलवी थांबवावी. मुख्यमंत्री बाधीत भागात, जिल्ह्यातजाणे म्हणजे एक दिलासा असतो. कारण लोकांना विश्वास द्यायला हवा. पुर्ण नुकसान शासन देऊ शकत नाही. राज्य सरकारने खावटी म्हणून ओला दुष्काळग्रस्त भागाला 5 हजार मदत द्यावी. केंद्राकडून जी मदत येईल तेव्हा येईल मात्र महराष्ट्राच्या तिजोरीतून तात्काळ मदत द्यावी. चांगल्या प्रतीचे अन्न, धान्य कडधान्य, तेल साखर तात्काळ वाटप करावे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वयंसेवी संस्थांना आवाहन करुन बाधीत कुटुंबाला तात्काळ कपडे, भांडीकुंडी देण्याचे आवाहन करावे.

सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचे वंचित आघाडीने जाहीर केले आकडे

- 1,45,000 हेक्टरचे नुकसान

- घरांची पडझड 230

- बेपत्ता 4 लोक

- पुरामुळे मयत 14

- दगावलेले जनावरे 850

- 8600 कुटुंबातील 32000 व्यक्ती स्थलांतरित आहेत

बातम्या आणखी आहेत...