आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:व्हीडीएफआयचा उपक्रम,घडवणारऑलिम्पियन; पुण्यात 35 खेळाडूंना 25 दिवसांचे खास प्रशिक्षण, बालेवाडीमध्ये शिबिरात व्हॉलीबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण

सोलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू तयार करण्यासाठी माजी खेळाडूंनी सुरू केलेल्या चळवळीला बालेवाडीतील प्रशिक्षण शिबिराने आकार येत असून यामुळे महाराष्ट्रातील व्हॉलीबॉल कात टाकण्याची चिन्हे दिसत आहेत.

महाराष्ट्रातील व्हॉलीबॉलला पुनश्च सोनेरी दिवस आणण्याच्या उद्देशाने माजी खेळाडूंनी व्हॉलीबॉल डेव्हलपमेंट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या (व्हीडीएफआय) माध्यमातून व्हॉलीबॉल विकासाची चळवळ सुरू केली आहे. ‘व्हीडीएफआय’च्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

बालेवाडीत राज्यातील निवडक खेळाडूंचे २५ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर सुरू झाले आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव असलेले पांडियन (तामिळनाडू) हे खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. खेलो इंडियासाठी राज्याच्या भक्कम संघाची उभारणी व्हावी, असा या शिबिराचा प्राथमिक उद्देश आहे. बालेवाडीतील शिबिरात सहभागी खेळाडूंची निवास, भोजनासह संपूर्ण व्यवस्था राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने केली आहे. माजी राष्ट्रीय खेळाडू तथा प्राप्तिकर आयुक्त विपुल वाघमारे यांनी राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यापुढे ‘व्हीडीएफआय’ची व्हॉलीबॉल विकासासाठी संकल्पना सादर केली.

बातम्या आणखी आहेत...