आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुमार चौक ( रेल्वे स्टेशन जवळील) ते भाजी मंडईपर्यंत महापालिकेतर्फे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे एका बाजूचा रस्ता बंद करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी नऊच्या सुमाराला दोन्ही बाजूचे रस्ते बंद केल्यामुळे सात रस्त्यावरून स्टेशनला जाणारी वाहने भाजीमार्केट मधून जात होती. यामुळे काही काळ वाहनांची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी नियोजन करून वाहतूक सुरळीत केले आणि एक बाजूचा रस्ता मोकळा केला.
वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना नियोजन करण्यासाठी सूचना दिल्या. काही वेळाने एका बाजूचा रस्ता मोकळा केला आणि वाहतूक नियोजन सुरू झाले. आणखी काही दिवस एका बाजूचा रस्ता वाहतुकीला बंद राहील पण डाव्या बाजूचा रस्ता ये-जा करण्यासाठी मोकळा आहे. कुमार चौक ते भाजी मार्केट या रस्त्यावर काम चालू आहे.
आसरा चौक, जुना होटगी नाका, गांधी नगर येथील सिग्नल बंदच
आसरा चौक, जुना होटगी नाका, गांधी नगर या चौकातील सिग्नलची सोमवारी सायंकाळी पाहणी केली असता बंद होते. महिला हॉस्पिटल, सात रस्ता वोडाफोन शोरूम, रंगभवन या चौकातील सिग्नल अनेक दिवसांपासून बंदच आहेत. याशिवाय डफरीन चौक येथील एका सिग्नल खांबावरील हिरवे, पिवळे, लाल तीन दिवे बंदच आहेत. सरस्वती चौकात मागील पाच-सहा दिवसांपासून सिग्नल सुरू झाले आहेत. चारही बाजूच्या दिशेने असलेल्या सिग्नल खांबावरील काही दिवे (हिरवे, पिवळे, लाल ) बंदच आहेत. काही चालू आहेत. टायमर नाही अशी अवस्था आहे. मार्केट यार्ड ते शांती चौक ते संत तुकाराम चौक आणि गुरुनानक चौक या मार्गावरील सर्व सिग्नल बंदच आहेत. भैया चौक, गुरुनानक चौक येथील सिग्नल फक्त लावून ठेवले आहेत. सहा - आठ वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. यामुळे अनेक दिवे मोडकळीस आले आहेत. याबाबत ना महापालिका नियोजन करते, ना वाहतूक पोलिस नियोजनासाठी प्रयत्न करतात?
ट्रॅफिक बूथमध्ये पोलिस थांबेनात
शहरातील प्रमुख २५ चौकांमध्ये नव्याने ट्राफिक बूथ बसवण्यात आले आहेत. पण त्या बूथमध्ये पोलिस थांबत नाहीत अशी स्थिती आहे. मग बूथचा काय उपयोग, असा प्रश्न समोर येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.