आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना टळली:धावत्या गाडीने अचानक घेतला पेट, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; पंढरपूर- मोहोळ मार्गावरील घटना

मोहोळ ( भारत नाईक)10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आगीत इंजन, बॉनेट, वायरींग, बम्पर,हेडलाईट, समोरील टायर, काच वगैरे जळुन अंदाजे पाच लाखांचे नुकसान

रिलायन्स जिओ कंपनीचे मॅनेजर नातेवाईकांना भेटून पंढरपूर होऊन सोलापूरकडे आपल्या कारमधून जात असताना कारच्या बोनेटमधून वायरिंग जळून कारने पेट घेतला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्री 7.30 च्या दरम्यान सोलापूर रस्त्यावरील मोहोळ शहराजवळील हॉटेल धुलवड समोर घडली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल माधव कराळे हे रिलायन्स जिओ कंपनीमध्ये बॅच मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्याकडे आय.20 कार के.एम.एच.42/ के.8680 आहे. रविवारी दुपारी पंढरपूर- मोहोळ मार्गे सोलापुरच्या दिशेने जात असताना हॉटेल धुलवडचे समोर आल्यावर अचानक कारचे इंजन, बॉनेट मधुन वायरींग जळुन धूर येऊ लागला. त्यामुळे कराळे यांनी तात्काळ कार रोडच्या डाव्या बाजूला उभा केली, तेवढ्यात गाडीला पूर्ण गाडीने पेट घेतला.

कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच हॉटेल वरील भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांनी कामगारांच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केला. कारला लागलेल्या आगीत इंजन, बॉनेट, वायरींग, बम्पर,हेडलाईट, समोरील टायर, काच वगैरे जळुन अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार अविनाश शिंदे करत आहेत.

कारने पेट घेताच मालक कराळे बाहेर पडले व त्यांनी आरडाओरडा सुरू केला. यानंतर भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांनी कामगारांच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू तर दुसरीकडे लोकसेवा होंन्डाचे कर्मचारी सचिन साळी यांनी प्रयत्न केले. त्यामुळे आग विझली. आग वाढत पेट्रोल टाकीपर्यंत आली असती तर गाडीचा स्फोट झाला असता, परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग विझवण्यात यश आले.

बातम्या आणखी आहेत...