आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध सामाजिक उपक्रम:वि.गु.शिवदारे स्मृती दिन ; व्याख्यान, रक्तदान शिबिराने होणार साजरा

सोलापूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी आमदार सहकारमहर्षी वि. गु. शिवदारे यांच्या चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त ८ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम आयोजिल्याची माहिती, समिती व सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन प्रकाश वाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवार ८ ऑगस्ट रोजी अॅम्फी थिएटर येथे सायंकाळी ५ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होईल. मंगळवार, दि. ९ ऑगस्टरोजी शिवानुभव मंगल कार्यालय येथे सकाळी दहा वाजता आरोग्य शिबिर, मोतीबिंदू शिबिर होईल. बुधवार १० ऑगस्ट रोजी जुळे सोलापुरातील फार्मसी महाविद्यालयात सकाळी दहा वाजता विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिर होईल. गुरूवार ११ ऑगस्ट रोजी लिंगशेट्टी मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता ग्राहक मेळावा होईल. १२ ऑगस्ट रोजी शिवदारे महाविद्ययालयात सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिर होईल. १३ ऑगस्ट रोजी शिवदारे महाविद्यालयात सकाळी ९.३० वाजता विज्ञान प्रदर्शन आयोजिले आहे. १४ ऑगस्ट रोजी युनिक इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी रंग भरण व चित्रकला स्पर्धा होईल. १५ ऑगस्ट रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. मंगळवार, दि. १६ ऑगस्ट रोजी फार्मसी कॉलेज येथे सकाळी दहा वाजता विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजिला आहे. सायंकाळी चार वाजता सिद्धेश्वर वुमन अभियांत्रिकी येथे सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन प्रदान कार्यक्रम होईल. बुधवार, दि. १७ ऑगस्ट रोजी वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या जीवन गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...