आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात विमानसेवा सुरू करा:विकास मंचचे 31 दिवसानंतर आंदोलन स्थगित; निर्णय न झाल्यास 28 डिसेंबरला मुकमोर्चा

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापुरातील विमानसेवा सुरू व्हावे या उद्देशाने पाच डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर सोलापूर विकास मंचच्या वतीने सुरू असलेला चक्री उपोषण मंगळवार पासून स्थगित करण्यात आले आहे.

विमानसेवा सुरू करण्याबाबत राज्य व केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. विमानसेवेबाबत हालचाल नाही झाल्यास 28 डिसेंबर रोजी मेकॅनिक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरुन मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मंचचे सदस्य केतन शहा व मिलिंद भोसले यांनी दिली.

विमानसेवा सुरू होण्यासाठी चक्री उपोषण सुरू केले. यात नागरिकांनी पाठींबा दिला. आंदोलन दरम्यान सिध्देश्वर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी आंदोलन स्थळी पिस्तुल घेऊन आले आणि केतन शहा यांना दाखवत गोळ्या घालण्याची भाषा केली. आंदोलन सुरू असताना राज्य व केंद्र सरकार सकारात्मक असल्याने आंदोलन मागे घेत पुढील काळात 28 डिसेंबर रोजी मुक मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

मंचच्या वतीने विमानसेवा सुरू करावे ही मागणी आहे. कारखान्याचे चिमणी पाडावी, शेतकऱ्यांचे नुकसान करावे असे नाही. शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केले जात आहे. यात निष्पाप लोकांना बळी देण्याचा प्रयत्न आहे. विनापरवाना चिमणी उभे करुन शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचे शहा म्हणाले.

आंदोलन सुरू झाल्यावर 28 दिवसांनी शिंदे बोलले. होटगी रोड विमानतळावरुन प्रवासी विमानसेवा सुरू होत असल्यास आमचे काही अडचण नाही. बोरामणी विमानतळ सुरू करेपर्यंत होटगी रोडवरुन प्रवासी विमानसेवा द्या. याबाबत माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारण करत आहेत. त्यांची वेळ घेऊन आम्ही त्यांची भेट घेणार आहोत असे केतन शहा म्हणाले.

यावेळी मंचचे मिलिंद भोसले, प्रसन्न नाझरे, विजय जाधव, योगीन गुर्जर, गणेश पेनगोंडा, अ‍ॅड. प्रमोद शहा, अ‍ॅड. खतीब वकील, आनंद पाटील आदी उपस्थित होते. पोलिसांनी स्वत:हून तक्रार दाखल करावे. आम्ही पोलिसांच्या नोटीसीस उत्तर देत त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...