आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविमानसेवा सुरू करण्याची मागणी करत सोलापूर विकास मंचचे चक्री उपोषण चौथ्या दिवशी बुधवारी सुरूच होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपोषण सुरू आहे. या आंदोलनात विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावून पाठिंबा दर्शविण्यासाठी स्वाक्षरी करत आहेत. नागरी विमानसेवा सुरू असली असती उद्योग वाढले असते. महापालिकेचे अडीच हजार कोटीपर्यंत बजेट वाढले असते.
हे यापुढील काळात टाळण्यासाठी विमानसेवा सुरु होणे आवश्यक आहे, असे मंचचे म्हणणे आहे. बुधवारी आंदाेलनस्थळी सोनामाता प्रशालेचे शिक्षक, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.दशरथ गोप, सोलापूर विज्ञान परिषद सोलापूर शाखेचे डॉ. व्यंकटेश गंभीर, महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष सुनील फुरडे, प्रदीप पिंपरकर, किशोर चंडक, शशिकांत जिद्दीमणी, विजयराज बाहेती, क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार प्रकाश भुतडा, बेकरी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय हिरेमठ, यशवंत फडतरेनी सहभाग नोंदवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.