आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात गावठी पिस्तुलासह एकाला अटक:विजापूर रोड परिसरात पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी । साेलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरच्या विजापूर रोड परिसरात शनिवारी एकाला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे जिवंत काडतुसांसह गावठी पिस्तूल मिळाले. विजापूर नाका पोलिसांनी त्याला लगेच अटक करून पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली.

विजापूर रस्त्यावरील ए. जी. पाटील कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर अंदाजे ४० वर्षे वयाचा एक इसम गावठी पिस्तुल (गावठी कट्टा) आणि जिवंत काडतुसे घेऊन होन्डा मोटार सायकलवर बसून कोणाची तरी वाट बघत थांबलेला होता, त्याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनपुडे पाटील यांच्या पथकाने हटकले. त्या वेळी तो पळण्याच्या प्रयत्नात होता. त्याला लगेच ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे पिस्तूल आणि काडतुसे असल्याचे आढळून आले.

आकाश भुजंगराव मोरे (वय ४४, रा. घर नं. ४६ विठ्ठल नगर सोरेगाव, सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे चालू स्थितीत असलेले गावठी पिस्तुल (अंदाजे किंमत २०,००० रूपये), दोन जिवंत मोठे काडतुसे (किंमत अंदाजे १००० रुपये), ५ लहान जिवंत काडतुसे (अंदाजे किंमत २,५०० रूपये) आणि त्याच्या ताब्यातील होन्डा कंपनीची मोटार सायकल (अंदाजे किंमत ८०,००० रूपये) असा एकूण १ लाख ३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विजापुर नाका पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५४०/२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ३.२५ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पिस्तुल आणि काडतुसे कोठुन आणली? कशासाठी वापर करणार होता, या बाबींचा तपास पोलिस करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कामगिरीत पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) डॉ. वैशाली कडुकर, सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील आदींचे मार्गदर्शन होते. कर्नाटक सीमेपासून जवळ असलेल्या विजापूर रस्त्यावरच ही घटना घडल्याने पोलिसांनी कर्नाटकातील गुन्हेगारांशी संबंधित काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...