आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:शिरनांदगी स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरनांदगी (ता. मंगळवेढा) येथील रेशन दुकानाची संपूर्ण चौकशी करावी, या मागणीसाठी काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

शिरनांदगी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुनील कांबळे यांच्याकडून ग्राहकांना नियमित धान्य मिळत नाही. शासकीय गोदामातून दुकानदार धान्य उचलतात पण प्रत्यक्षात ग्राहकांना वाटप करण्याऐवजी अन्यत्र त्याचा गैरप्रकार करतात. त्या संदर्भात पुराव्यासह तक्रारी स्थानिक प्रशासनाकडे केल्या होत्या. पण, संबंधितांनी तक्रार-दारांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, अशी तक्रार बाळाबाई गायकवाड यांनी केली.

शिरनांदगी येथील रेशन दुकानदाराची चौकशी करून वंचित ग्राहकांना न्याय द्यावा, या मागणीसाठी उपोषण सुरू केले असल्याचे, नारायण शिवराम खांडेकर यांनी सांगितले. शाकुबाई खांडेकर, गजानन गायकवाड, दौलत कोळेकर, बाळाबाई कोळेकर, सुमन कोळेकर, आकाश खांडेकर, हिराबाई कोळेकर आदी सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...