आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी बोलायला जीभ वळत नाहीत मात्र ते बोलले. शब्दांची पारख झाली या शब्दांवर प्रेम केले. मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या मणिपूरच्या मुलांनी अभिव्यक्तीच्या उपक्रमातून मराठी गीतांवर नृत्य, देवदेवतांचे चित्र रेखाटले. ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून परराज्यातून सोलापुरात आलेल्या मणिपूरच्या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील महाराष्ट्र राज्याच्या अनेक कलाकृतींचा अंग अवगत व्हावं म्हणून अनोखा उपक्रम हाती घेतला होता यातील प्रशिक्षणानंतर अभिव्यक्ती सादरीकरण करण्याचा कार्यक्रम शनिवारी चैतन्य भुवन सात रस्ता येथे पार पडला . यावेळी पाण्याचा प्रयोग दाबाचा प्रयोग आणि लिटमस पेपरचा प्रयोग असे अनेक प्रयोग सादर केले. तर सिद्धेश्वर महाराज म्हणजे कोण याची माहिती असणारे विठोबा म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. हे जाणणारे हे छोटे छोटे आहात हुबेहूब त्यांची प्रतिकृती काढण्यात रंगले होते. त्याचा डेमो रसिकांच्या समोर देण्यात आला. यावेळी अमोल गांगजी, मेघा कुणी, आनंद अल्लाशे, अविनाश गवळी आणि संदीप कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे टप्प्याने सादरीकरण केले. एकवीरा आई गीतावर थिरकले
यावेळी या आठ मुलांनी एकवीरा आई तू डोंगरावरी या गीतावर सुंदर पदलालित्य केले तर वंदे मातरम जय भारत हे देशभक्तीपर गीत सादर केले. तीन ही सगळी मुलं तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातली असल्याने त्यांच्या सर्वांच्या मातृभाषा या वेगवेगळ्या होत्या. लुंगदिंगवाऊ पामाईब, येमनन होराम, जॉन हाऊकिप , जयदिगलुंग पामाई, पाउथिनकाय हाऊकिप, सिमका होराम, , नगमिलेन हाऊकिप, प्रेशस होराम, इनॉक गंगमाई. गिनखाऊ हाऊकिप यांनी यात सहभाग घेतला. देशभक्तीपर गीत , आई बद्दलचे ऋण व्यक्त करणारे गीत आणि आपल्या देशाचे कौतुक करणारे गीत त्यांनी गायले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.