आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराही निवडणूक वेगळ्या वळणाला जाऊ देऊ नका, समोरच्या दोन्ही गटांनी ही वैचारिक पद्धतीने निवडणूक लढवावी.तुम्ही कारखान्यासाठी पैसे कुठून उभे करणार, जप्तीची कारवाई कशी थांबवणार, हे लोकांना प्रथम सांगा, मगच तुम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन श्री विठ्ठल परिवर्तन विकास पॅनेलचे प्रमुख अभिजित पाटील यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, सिद्धेवाडी येथे त्यांची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
श्री पाटील म्हणाले, विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून संपूर्ण पंढरपूर तालुका पुन्हा आपल्याला उभा करायचा आहे. पुन्हा अर्थक्रांती सुरू करण्यासाठी कारखाना चालू करणे गरजेचे आहे. हे वारसदार नुसते वारसा सांगत फिरतात यांना एखादं दुकान टाकता येईना. एखादी टपरी टाकता येईना. एखादं पंक्चर दुकान टाकता येईना. आणि ह्यांनी मापं कुणाची काढावीत, असा सवाल त्यांनी भगीरथ भालके व युवराज पाटील या दोन्ही गटाचे नाव न घेता केला.
यावेळी पंचायत समितीचे मा. सभापती विष्णु बागल, पंढरपूर माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, संचालक दिनकर चव्हाण, राजाराम सावंत, तालुका अध्यक्ष सचिन पाटील तसेच कासेगाव, सिद्धेवाडी येथील शेतकरी सभासदांनी मोठी गर्दी केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.