आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांची माेठी गर्दी‎:विठ्ठल उभे तिरुपतीच्या रूपात‎ रुक्मिणी झाली पद्मावती अम्मा‎

साेलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साेमवारी वैकुंठ एकादशीनिमित्त ‎पूर्वभागातील व्यंकटेश्वर मंदिरात ‎दर्शनासाठी भाविकांची माेठी गर्दी‎ हाेती. मंदिर विविध फुलांनी सजवले ‎ ‎ हाेते. उत्सवमूर्तींना अलंकृत‎ करण्यात आले हाेते. जुना विडी ‎घरकुलच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात ‎पांडुरंगाला तिरुपतीचे रूप देण्यात‎ आले हाेते.

बाजूलाच उभ्या माता ‎ ‎ रुक्मिणी पद्मावती अम्माच्या रूपात ‎हाेत्या. तिथेही दर्शनासाठी भक्तगण माेठ्या संख्येने हाेते.‎ दत्तनगरातील बालाजी मंदिरात‎ सकाळपासूनच भक्तांच्या रांगा‎ लागल्या हाेत्या. विशेष दर्शनासाठी‎ देणगीने प्रवेश येत हाेता.‎

तीर्थक्षेत्र पंढरी हे भूवैकुंठ‎ पांडुरंग भक्तीचा भुकेला‎
पांडुरंगाचे स्थान असलेले‎ पंढरपूर हे भूतलावरील वैकुंठच‎ आहे. पुत्रदा एकादशी अर्थातच‎ वैकुंठी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन‎ पुण्यप्रद असते. विठुमाऊली हा‎ भक्तीचा भुकेला आहे. त्याला शरण‎ गेलेला सामान्य भक्तही थेट‎ चरणांवर माथा टेकून येताे. असे‎ दर्शन देशात कुठेच नाही, असे हभप‎ राकेश महाराज अन्नम यांनी‎ सांगितले.

घरकुलमधील‎ विठ्ठल-रखुमाई मंदिरासमाेर‎ साेमवारी सायंकाळी त्यांचे प्रवचन‎ झाले. त्यांना एेकण्यासाठी विडी‎ कामगार महिलांची माेठी गर्दी हाेती.‎ आरतीने वैकुंठ उत्सवाची सांगता‎ झाली. या वेळी अध्यक्ष विवेकानंद‎ चन्ना, सचिव वासुदेव यलदंडी‎ यांच्यासह राजू कुडक्याल, महेश‎ ताटी, प्रशांत बिनगुंडी, विठाेबा‎ कैरमकाेंडा, शिवकुमार दिड्डी आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...