आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रार्थना:विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार, नामदेव पायरीचा विकास प्राधान्याने करण्याचे निर्देश

पंढरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपुरात कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. या वेळी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द गावच्या उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे या दांपत्यास महापूजेचा मान मिळाला. गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊ दे, राज्य सुजलाम सुफलाम व्हावे यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्र्यांनी घातले. विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार व नामदेव पायरीचा विकास प्राधान्याने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी जिल्हा प्रशासनाला दिले.

या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आ. हरिभाऊ बागडे, बबनराव पाचपुते, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, पंढरपूर वारीच्या सर्व परंपरा अखंडित ठेवून वारकरी संप्रदायाच्या परंपरा पाळाव्यात. स्थानिकांना विश्वासात घेऊन व कोणालाही विस्थापित न करता अधिग्रहीत जागेचा योग्य मोबदला देऊन पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करण्यात येईल. नामदेव पायरी ही एक अभूतपूर्व व्यवस्था आहे. मंदिराच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने होईल. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा लवकरच अंतिम टप्प्यात फुलंब्रीतील साळुंखे दांपत्य ठरले मानाचे वारकरी शिरोडी खुर्द गावच्या (ता. फुलंब्री)उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे या दांपत्यास महापूजेचा मान मिळाला. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. राज्य परिवहन महामंडळातर्फे त्यांना एक वर्ष कालावधीचा मोफत प्रवासाचा पास सुपूर्द देण्यात आला. साळुंखे हे समाजकल्याण कार्यालयातून सेवानिवृत्त झाले असून ते ५० वर्षांपासून वारी करताहेत.

बातम्या आणखी आहेत...