आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:तृतीयपंथी व्यक्तींसाठी मतदार नोंदणीसाठी शिबिर; 27 मार्च ते 2 एप्रिल आयोजन

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त उपक्रम

आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त (३१ मार्च) निवडणूक आयोगाकडून तृतीयपंथी व्यक्तींसाठी मतदार नोंदणीचे विशेष शिबिर आयोजित केले आहे. ते २७ मार्च ते २ एप्रिलपर्यंत सुरू असणार आहे.

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात विविध माध्यमांद्वारे तृतीयपंथींच्या मतदार नोंदणीच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

तृतीयपंथी मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, अक्क्लकोट, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व माळशिरस-संबंधित तहसील कार्यालय, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर- निरामय आरोग्य धाम, पेशंट असोशिएट बिल्डिंग, सरस्वती बुक डेपोच्या पाठीमागे, नवी पेठ येथे नोंदणी करता येईल. १ जानेवारी २०२२ रोजी ज्या तृतीयपंथी नागरिकांचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले आहे. परंतु त्यांनी अद्याप मतदार यादीमध्ये नाव नोंदणी केलेली नाही. अशा सर्व नागरिकांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी ३० मार्च २०२२ रोजी संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेऊन मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...