आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रा.पं. निवडणूक:शांततेत मतदान; 177 गावांची उद्या मतमोजणी

पंढरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८७.०३ टक्के इतके मतदान शांततेत झाले आहे. तालुक्यातील खरातवाडी ग्रामपंचायतीसाठी ९५.६३ टक्के सर्वाधिक तर व्होळे ग्रामपंचायतीसाठी सर्वात कमी ८०.०९ टक्के इतके मतदान झाले आहे. तालुक्यात सर्वत्र शांततेत आणि चुरशीने मतदान झाले असून मंगळवारी मतमोजणी होणार आहे.

सुगाव भोसे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उर्वरित तुंगत, मेंढापूर, पुळुजवाडी, खरातवाडी, होळे, खेड भोसे, बार्डी, अजोती, टाकळी (गुरसाळे), नेमतवाडी या दहा गावांमध्ये उत्साहात मतदान सुरू झाले आहे. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून गावनिहाय झालेले अंतिम मतदान पुढीलप्रमाणे आहे. पुळूज ९१ टक्के, खरातवाडी ९५.६३टक्के, आजोती ९०.९८ टक्के, व्होळे ८०.०९ टक्के, खेडभोसे ९८.२१ टक्के, बार्डी ९०.४१ टक्के, टाकळी गुरसाळे ९०.०२ टक्के, नेमतवाडी ८९.०१ टक्के, मेंढापूर ८८.७३ टक्के आणि तुंगत ग्रामपंचायतीठी ८५.०३ टक्के मतदान झाले.

माळशिरस ८० टक्के मतदान
अकलूज

माळशिरस तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींसाठी ८०.०२ टक्के मतदान झाले. नेवरे हे गाव बिनविरोध झाले आहे. मतदानाची टक्केवारी -तिरवंडी ८८.१३, कचरेवाडी ९०.१४, मोटेवाडी ९१.४३, तरंगफळ ९०.७८ इस्लामपूर ८८.८९, वेळापूर ७२.६, उघडेवाडी ६८. ४७, धानोरे ८४.९१, बागेवाडी ७३.०६, आनंदनगर ८६.२६, यशवंतनगर ५५.६९, संगम ८८.३५, जांभूड ८२.८६, माळेवाडी (बो.) ८४.७६, कोळेगाव ७८.६३,फळवणी ८१.०८, काळमवाडी ८८.६८, खंडाळी दत्तनगर ७८.४१, सदाशिवनगर ८०.६९, पुरुंदावडे ८९.५१, लोंढे-मोहितेवाडी ८५ . ८६ टक्के , गुरसाळे ८६.७ टक्के, तांबेवाडी ७१.७५, मेडद ८६.२२ टक्के, उंबरे (द.) ८९.८२, पळसमंडळ ८९.१, तामशीदवाडी ८५.५२, मारकडवाडी ८२.४९, चांदापुरी ८८.७५% मतदान झाले.

अक्कलकोट ७९.३० टक्के
अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यात २० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक शांततेत ७९.३० टक्के मतदान झाले. आधीच दहा ग्रामपंचायतीमधून नाविंदगी १०, रुद्देवाडी २,सलगर ०१, अंकलगी ३, खानापूर ३, कोन्हाळी १, शिरवळ ८, शिरवळवाडी १, दर्शनाळ ४,घोळसगाव १ असे ३४ सदस्यांची निवड बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बाळासाहेब शिरसाट लक्ष ठेवून होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेत मतदान झाले.

तालुक्यात गावनिहाय झालेले मतदान
बोरगाव देशमुख ७९.१७ टक्के, पालापूर, ८३.१२, घोळसगाव ७५.३० ,सुलतानपूर ८५.४८, अरळी ८५.४४, बोरेगाव, ८५.४४, दर्शनाळ ८५.४६, दहिटणेवाडी ८७.६६, शिरवळवाडी ८३.२९, सदलापूर ७७.०९, शिरवळ ६०.३१, कोन्हाळी ७४.९७, हालचिंचोळी ८१.२२,अंकलगे ८३.७० , खानापूर ८१.८३, रुहेवाडी ८६.८२, आंदेवाडी ज ८३.७३, हत्तीकणबस ८८.५१, सलगर ८०.८५ ,नाविंदगी ७७.८१, एकूण ७९ टक्के मतदान झाले.

बातम्या आणखी आहेत...