आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थलांतरीत पक्ष्यांचा आगमनाची प्रतीक्षा:'माहेर घर’ला शेकडो मौलावरून येणाऱ्या पक्ष्यांचे आगमन होण्याची आशा

विनोद कामतकर | सोलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टी अन् हवामानातील बदलांमुळे शहर व जिल्ह्यातील पाणवठ्यांवर दरवर्षी ऑक्टोबर दरम्यान शेकडो मैलांवरून होणारे स्थलांतरीत पक्षी अद्याप मोठ्या संख्येने दाखल झालेले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली थंडीमुळे येत्या काही दिवसांमध्ये पाणवठ्यांवर पक्ष्यांचे आगमन होण्याची आशा पक्षिमित्रांना आहे.

ज्येष्ठ पक्षी तज्ञ डॉ. सालीम अली यांनी सोलापूर हे, स्थानिक व स्थलांतरीत पक्षांचे माहेर घर, अशी उपाधी दिली होती. येथील पाणवठ्यांवर दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान शेकडो मैलांवरून स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने दाखल होतात. पण, यंदाच्या वर्षी दिवाळीपर्यंत सर्वत्र अतिवृष्टी झाली. वातावरणातील बदल अन् थंडी नसल्यामुळे पक्षांचे स्थलांतर लांबले. पावसाळ्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागताच उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून अनेक उत्तुंग पर्वत श्रेणी व अथांग महासागरावरून प्रवास करून हजारो किलोमीटर अंतर पार करून दरवर्षी उजनी पाणलोट क्षेत्रात शेकडो प्रकारच्या लक्षावधी संख्येने विदेशी पक्षी न चुकता वाऱ्या करतात. सामान्यपणे उजनीवर स्थलांतरित पक्षी हिवाळी पाहुणे म्हणून तीन टप्प्यात येतात. पहिला टप्पा ऑक्टोबर दरम्यान, दुसरा टप्पा डिसेंबर मध्यापर्यंत तर शेवटचा टप्पा डिसेंबर महिन्याच्या शेवट व जानेवारी महिन्याच्या प्रारंभीच्या दिवस शेकडो महिला वरून पक्षी स्थलांतरित होऊन सोलापूर शहर व परिसरातील पानवठावर उतरतील

हवामानातील अस्थिरता व अनियमितता हा स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या प्रवासावर विपरीत परिणाम होतो. यावर्षी पावसाळा सरताना धोधो पडलेल्या पाऊस व अचानक पडलेली थंडी व लगेच वाढलेल्या तापमानामुळे पक्ष्यांच्या आगमनानंतर परिणाम झालेला जाणवतोय. याच कारणामुळे ऑक्टोबर महिन्यात येऊन दाखल होणारे गलपक्षी (समुद्र पक्षी) व मत्स्यघार अद्याप आले नाहीत. वातावरण स्थिरावल्यानंतर धरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी वाढेल, असे पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी सांगितले.

सोलापूर पक्षी अभ्यासक शिवानंद हिरेमठ म्हणाले की, जिल्ह्यात आत्तापर्यंत 323 प्रजातींच्या पक्ष्यांची छायाचित्रांसह नोंदी झालेल्या आहे. त्यापैकी आठ ते नऊ प्रकारचे पक्षी दुर्मिळ आहेत. अतिवृष्टी, हवामानातील बदलांचा मोठा परिणाम पक्ष्यांचा स्थलांतरावर झाला आहे. हिप्परगा तलावात पाणीपातळी जास्त असल्याने काही पक्षी इतर छोट्या-मोठ्या पाणवठ्यांचा आसरा घेत असल्याचे चित्र आहे. सध्या, गवत वाळत असल्याने त्यावर किटकांची संख्या कमी झाल्याने अन्नाची उपलब्धता कमी झाल्याने माळरानावरील शिकारी पक्ष्यांचा संख्या, मुक्कामावर होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...