आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:प्रभागवार मतदारयादी 7 जुलैला जाहीर होणार ; प्रारूप यादी १७ जून रोजी, ८.११ लाख मतदार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेसाठी प्रभागावर मतदार यादी करण्याचे काम निवडणूक आयोगाने सुरू केले आहे. १७ जूनपर्यंत प्रारूप यादी जाहीर होईल. त्यावर सूचना व हरकती घेऊन अंतिम यादी ७ जुलै राेजी प्रसिध्द होणार आहे. ही माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ९.५१ लाख आहे. ३१ मे २०२२ पर्यंत नोंद केलेल्या मतदारांची नावे महापालिका निवडणुकीसाठी पात्र असतील. ४ जानेवारी २०२२ पर्यंत नोंद केलेले ८.११ लाख मतदार असून, यात पुन्हा वाढ होणार आहे. यादी करण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्तांना निवडणूक आयोगाकडून आदेश आला आहे. अधिकृत ९.५१ लोकसंख्या असलेल्या शहरात अधिकृतपणे ८.११ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत.

ओबीसी नोंदणी नियोजन ओबीसी मतदार नोंदणी करण्यास ७५० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात अाली. त्यांची शुक्रवारी बैठक घेऊन सूचना करण्यात आली. एका अधिकाऱ्यांकडे हजार ते १२०० जणांची यादी असेल. त्यातील ओबीसीची खात्री करून त्याचे अहवाल १० जूनपर्यंत देतील. त्यानंतर ओबीसीची मतदार नक्की होतील.

बातम्या आणखी आहेत...