आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाची एेशी-तैशी:गोदाम बेकायदाच; पोलिसांकडून गुन्हाप्रशासनाकडून अद्याप परवान्याचा शाेध

साेलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी तालुक्यातील पांगरी शिवारात रविवारी फटाक्यांच्या कारखान्याला आग लागून चार महिला कामगारांचा करुण अंत झाला. या दुर्घटनेला २४ तास उलटूनही जिल्हा प्रशासनाला कारखान्याची परवानगी, त्याची उत्पादन क्षमता किती? एकाच परवान्याने दोन ठिकाणी उत्पादन कसे? गोदामांमध्ये उत्पादन करता येते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देता आलेली नाहीत. माहिती घेण्याचेच काम सुरू असल्याचे अधिकारी म्हणाले.

अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे साेमवारीही घटनास्थळी हाेते. शाेधकार्य थांबवल्याचे सांगून ते म्हणाले, “दुर्घटनेनंतर महसूल आणि पोलिस प्रशासन मदत आणि बचावकार्यात हाेते. त्यामुळे कारखान्याला परवाना होता का? कोणत्या गटासाठी परवानगी दिली? कोणत्या तारखेपर्यंतही त्याची वैधता होती? या गोष्टींची चौकशी करण्यात येत आहे.

प्रांताधिकारी हेमंत निकम यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘फटाके कारखान्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी देण्यात येत असल्याने त्याबाबतची माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही.’’ निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दुपारी कार्यालयात नव्हत्या. सेतू कार्यालयात प्रशासकीय बैठकीत व्यस्त होत्या.

बचाव कार्य थांबले
रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास कारखान्याने पेट घेतला. स्फोटांची मालिकाच सुरू झाली. आत १० महिला काम करत होत्या. पैकी पाच महिला सुखरूप बाहेर पडल्या. उर्वरित पाच महिलांना आगीने लपेटले हाेते. त्यात चार महिलांचा तडफडून मृत्यू झाला. एक महिला गंभीर असून, तिच्यावर साेलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जिल्हा प्रशासन यंत्रणा सोमवारीही घटनास्थळी होती. सकाळी बचाव आणि मदतकार्य सुरू झाले होते. परंतु सर्वत्र नुसतीच राख आढळल्याने ते थांब‌वण्यात आले.

परवाना दिला की नाही, माहिती मागवली
पांगरीपासून दोन ते अडीच किलोमीटरवर असलेल्या कारखान्याची दोन ठिकाणे आहेत. एक उत्पादन आणि त्याला लागून गोदाम होते. तेथेही महिला काम करत होत्या, असे सांगण्यात आले. दारूगोळा साठवणुकीच्या ठिकाणी काम करणे धोकादायकच होते. फटाकेनिर्मिती, दारूगोळा साठवणुकीला जिल्हा प्रशासनच परवाने देत असते. कारखान्याला परवाना दिला होता का, याची माहिती मागवली आहे. तत्पूर्वीच चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.''- तुषार ठोंबरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी

अधिकारी काय करत होते?
परवाना नसलेला कारखाना म्हणजेच बेकायदेशीरच. ही बाब तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांना माहीत नव्हती काय? त्यांनी काय कारवाई केली. वेळीच कारखाना सील केला असता तर त्या ४ निष्पाप महिलांचे जीव वाचले असते. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.''- भाऊसाहेब आंधळकर, नेते, बाळासाहेबांची शिवसेना

बचावलेल्या माया शिंदे यांनी सांगितली आपबीती
बार्शी

आम्ही कारखान्यात शेडमध्ये शॉट (आकाशात जावून उडणारे फटाके) बनवत होतो. शेडला तीन मोठे दरवाजे होते. आम्ही पाचजणी शेडच्या एका दरवाजाजवळ होताे. सुमन, मोना व इतर काहीजणी आतल्या बाजूस होत्या. तेथील दरवाजा बंद होता. दुसऱ्या शेडच्या दरवाजाच्या बाजूने शेड बाहेरुन जाळाचा भडका आत आला.

अन् मालक मोठ्याने ओरडले. सगळीजण बाहेर पडा. तसे आम्ही दरवाजाजवळ असणाऱ्या बाहेर पळालो. रस्त्यावर येईपर्यंत मागे मोठा स्फोट झाला. जाळाचे लोट बघून तिथ्ेच उन्मळून पडलो. जिवाच्या आकांताने पुन्हा उठलो, पळालो. सुमन, मोना मध्येच होत्या. आम्ही शेडच्या दरवाजाजवळ होतो म्हणून आम्हाला बाहेर पडता आले व आम्ही यात वाचलो, अशी आपबीती या घटनेतून बालंबाल बचावलेल्या वालवड (ता. बार्शी) येथील माया अंकुश शिंदे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितली.

सुरक्षा उपकरणे दिली नव्हती
मालकाचे दोन ठिकाणी शेड आहेत. खालच्या शेडला आदल्या आणि वरच्या शेडमध्ये शॉट बनत होते. िजथ आग लागली तेथे ३० ,६०, १२०, २४० अशी शॉट बनतात. गावात रोजगार मिळत नसल्याने आम्ही तिथे कामाला जात होतो. रोज ४ पेट्या तयार करायचो. पेट्यावर रोजगार मिळायचा. आठवड्याला माल जायचा. त्यांचा पाटेकर (भागीदार) हा कारखान्यात यायचा. फटके कारखान्याच्या मालकाने फटाके बनवण्याचे प्रशिक्षण अथवा सुरक्षा उपकरणे दिली होती का? यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...