आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक कला प्रकार सादर:ताता गणपती मिरवणुकीसाठी पंढरपूरहून वारकरी पथक

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व विभागातील प्रसिद्ध ताता गणपती मंडळ आपल्या मिरवणुकीच्या समारोपाला आगळावेगळा पारंपरिक कला प्रकार सादर करणार आहे. पूर्वी विभाग मध्यवर्ती मंडळाच्या मिरवणुकीत आपली वेगळी ओळख असणाऱ्या या गणपती मंडळाकडून यंदाच्या वर्षी खास पंढरपूर वरून दीडशे वारकरी असलेल्या जोगदंड महाराज वारकरी मंडळाचा समावेश करण्यात येणार आहे. डीजे आणि इतर गोष्टींना फाटा देत हे मंडळ पुन्हा पारंपरिक आणि कलात्मक गोष्टीकडे वळणार असल्याची माहिती, मंडळाचे प्रमुख विश्वस्त उमेश मामड्याल यांनी दिली आहे. या मंडळाच्या वतीने आजवर अनेक विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीच्या वेळेला डौलात सादरीकरण करत या मंडळाने आजवर आपला वेगळा पायंडा रचला आहे. यंदाच्या वर्षी वेगळा विचार म्हणून या मंडळाने सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वैष्णवांच्या पताका आणि भक्ती सांप्रदायाचा वारसा पुढे नेण्यासाठी वारकरी सांप्रदायाच्या जोगदंड वारकरी संघ या पंढरपूरच्या संघाला पाचरण केले आहे. या १० मृदंगधारी १० वीणाधारी आणि विसर्जन टाळकरी असे स्वरूप असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...