आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:उपचार घेत असलेल्या वारकरी महिलेचे निधन; मृत्यूची संख्या आठ

सांगोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनोनी येथे दिंडीमध्ये कार घुसल्याने सात वारकऱ्यांंचा मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी होते. त्यातील एका महिलेचा शनिवारी पंढरपुरात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सरिता अरुण सियेकर (वय ४५, रा. जठारवाडी, जि. कोल्हापूर) असे वारकरी महिलेचे नाव आहे.

रविवारी सकाळी जठारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती सरपंच नंदकुमार खाडे यांनी दिली. या अपघातातील मृतांची संख्या आठ झाली आहे. यातील शानू विलास सियेकर यांच्यावर अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. याबाबत तुकाराम काशीद (रा. सोनंद, ता. सांगोला व सरदार रा. पंढरपूर) यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...