आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षी अभयारण्य:वन्यप्राण्यांच्या शिकारी होणाऱ्याभागामध्ये गस्त पथकांचा वॉच

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नान्नज-गंगेवाडी माळढोक पक्षी अभयारण्यांच्या क्षेत्रांमध्ये वन्यजीवांच्या शिकार झालेल्या परिसरात वन विभागाचे विशेष गस्त पथक वॉच ठेवणार आहे. खबऱ्यांचे नेटवर्क सक्षम करा, विविध यंत्रणांची मदत घ्या, माळढोकच निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना सहायक प्रधान मुख्य वनसंरक्षक (मुंबई) क्लेमेंट बेन यांनी दिल्या.

श्री. बेन दोन दिवसांच्या माळढोक अभयारण्यांच्या दौऱ्यावर आले होते. सोमवारी (दि. १) वन विश्रामगृहामध्ये सोलापुरातील वन्यजीव अभ्यासक, पर्यावरणस्नेही संस्थांची बैठक घेतली. वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धनासह, पर्यटनवाढीबाबत चर्चा केली.त्यावेळी सहायक वनसंरक्षक दिलीप वाघचौरे (पुणे), बाबा हाके (सोलापूर), मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा, वन्यजीव अभ्यासक डॉ. निनाद शहा, शिवानंद हिरेमठ, पंकज चिंदरकर, संतोष धाकपाडे आदी उपस्थित होते.

डॉ. शहा म्हणाले, “अभायरण्यात गवताची वाढ वेडीवाकडी झालेली आहे. तसेच, अनावश्यक वाढलेली झाडी, झुडपं हटवा.”
हिरेमठ व चिंदरकर यांनी माळढोकच्या अधिवासाची माहिती दिली. श्री. छेडा यांनी अभयारण्य परिसरातील शिकारी, वाढलेल्या झाडी-झुडपांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. श्री. बेन म्हणाले, “परतलेल्या माळढोक च्या हालचालींवर लक्ष ठेवून अभ्यासासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.स्थानिकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.”

बातम्या आणखी आहेत...