आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी मराठा वस्तीमधील काही घरांमध्ये शिरले. भविष्याचा विचार न करता नऊ ते दहा वर्षापूर्वी या परिसरात चार आणि सहा इंची ड्रेनेज लाइन टाकण्यात आली. यामुळे नागरिकांना या संकटाला सामोरे जावे लागले. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे महापालिकेने तत्काळ येथील लाइन बदलण्याचे काम होती घेतले. हे काम होण्यासाठी माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी पुढाकार घेतला.
मराठा वस्ती ही शहरातील दाट घरांची वस्ती. तरी सुध्दा महापालिकेने भविष्याचा विचार न करता नऊ ते दहा वर्षापूर्वी या परिसरात चार आाणि सहा इंची ड्रेनेज लाइन टाकली. सुरुवातीला काही अडचण आली नाही. नंतर ड्रेनेज लाइन तुंबण्याचे प्रकार वाढले. नागरिकांची ओरड व्हायची तेव्हा महापालिकेचे कर्मचारी यायचे आणि ती लाइन स्वच्छ करून जात होते.
या परिसरातील रस्ते अरुंद असल्यामुळे ड्रेनेज स्वच्छ करण्यासाठी वाहन आतमध्ये येऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांमार्फतच काम करावे लागते. मंगळवारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे या परिसरातील ड्रेनेज लाइन तुंबल्याने अनेक घरात पाणी शिरले मध्यरात्री माजी नगरसेवक अनंत जाधव कार्यकर्त्यांसह आले आणि चर मारून पाण्याचा निचरा करून दिला. तसेच आयुक्तांना फोन करून परिस्थिती सांगितली. दुसऱ्या दिवशी मराठा वस्तीमधील तीन गल्लीतील ड्रेनेज लाइन काढून नऊ इंची लाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. नागरिकांनी निश्वास सोडला.
ते काम करणे खूपच गरजेचे होते. मोठा पाऊस आला तर पुन्हा नागरिकांना त्रास होईल त्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून हे काम करण्याचा शनिवारी निर्णय घेतला. झोनमधील मक्तेदार अतिष अलकुंटे यांच्यामार्फत काम सुरू आहे. या कामाला एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.'' व्यंकटेश चोबे, झोन अधिकारी
पूर्वी या परिसरात चार आणि सहा इंची ड्रेनेज लाइन टाकण्यात आली. त्यामुळे लाइन तुंबून हे पाणी पावसामुळे लोेकांच्या घरात शिरले. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. ''अनंत जाधव, माजी नगरसेवक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.