आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:पाणीपुरवठा तीन दिवसांआड करा; आमदार शिंदे

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शहरात चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात सुधारणा करून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करा, एमआयडीसीत नागरी सुविधा द्या आणि तेथील अंतर्गत रस्ते करा, अमृत योजनेंतर्गत असलेली अर्धवट कामे त्वरित पूर्ण करा’, अशा सूचना आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्या.शहराच्या विविध प्रश्नांबाबत त्यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याशी चर्चा केली.

काही दिवसांपूर्वी शहरातील विविध विकासकामे आणि अडचणींबाबत आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांनी नूतन आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी आमदार शिंदे यांनी भेटल्या. पाणीपुरवठ्याची काही कामे सुरू असून, त्यानंतर संपूर्ण शहरात तीन दिवसांंआड पाणीपुरवठा होईल, असे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी सांगितले.

अक्कलकोट रोड एमआयडीसीत अंतर्गत सुविधा आणि रस्ते कामाबाबत चर्चा झाली. तेथील अग्निशमन केंद्राच्या अडचणी मांडल्या. रस्ते कामासाठी निधी दिला पण काम होत नाही यावरही चर्चा झाली. सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा मुद्दा आमदार शिंदे यांनी मुद्दा केला.

गुंठेवारीत लक्ष घाला
पुण्याप्रमाणे सोलापुरात गुंठेवारी जागेस बांधकाम परवानगी द्या, असे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी सांगितले. गुंठेवारी परवानगीबाबत बैठक घेऊन तोडगा काढू, असे आयुक्त तेली-उगले यांनी सांगितले. बैठकीस माजी नगरसेवक संजय हेमगड्डी आदी उपस्थित होते.

पाणीपुरवठ्यावर चर्चा
महापालिका आयुक्तांना शहरातील पाणीपुरवठाबाबत चर्चा केली. दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा, तसेच एमआयडीसीतील नागरी सुविधांचे प्रश्न होते. त्यांना विविध कामाची माहिती देत त्याकडे लक्ष देण्याची सूचना केली.’’ -प्रणिती शिंदे, आमदार

बातम्या आणखी आहेत...