आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या वतीने शहरातील पाण्याचे बिल वर्षातून एकदा वसूल करण्यात येते. त्यात बदल करत आता दर तीन महिन्यांनी बिले वाटप करून वसुली करण्यात येणार आहे. त्याबाबत महापालिकेत असलेल्या उपसमितीत २८ जून रोजी प्रशासकीय ठराव मंजूर झाला आहे. शहरातील प्रत्येक नळास मीटर बसवण्यात येणार आहे. त्यानंतर दर तीन महिन्यांनी बिले वाटप करून वसूल करण्यात येणार आहे. घरगुती, बिगर घरगुती आणि औद्योगिकसाठी तिमाही बिले देण्यात येतील.
पाण्याचा वापर किती झाला हे पाहून त्या प्रमाणात बिल देण्याची पद्धत लागू होणार आहे. यामुळे पाण्याचा मर्यादित वापर होणार आहे. अाता वार्षिक भाडे असल्याने पाण्याचा वापर अमर्यादित होतो. पुढील काळात मीटर पद्धतीने शहरात एकाचवेळी बिले वाटप करण्यात येणार आहे. एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च अशी चार टप्प्यात बिले वाटप करण्यात येतील.
आता ३७७ ठिकाणी मीटर
महापालिने आता शहरात ३७७ ठिकाणी मीटर लावले आहेत. ते औद्योगिक ठिकाणी आहेत. आगामी काळात प्रत्येक घरास मीटर लावण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने पायलट प्रोजेक्ट म्हणून बाळीवेस परिसरात बुधले गल्ली आणि इतर ठिकाणी इलेक्ट्रिक पाण्याचे मीटर लावण्यात आले. मीटरनुसार बिले वाटप करण्यात येत नाही. भविष्यकाळात मीटरनुसार बिले वाटप करू असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने ९० कोटी रुपये खर्च करून स्काडा प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यासाठी काम सुरू आहे. चाचणी करण्यासाठी विजापूर रोड परिसरातील आदित्य नगर पाण्याच्या टाकीसह तीन टाक्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
चावीवाल्याची गरज भासणार नाही
स्काडा प्रणाली सुरू केल्यावर पाणी सोडण्यासाठी चावीवाल्याची गरज भासणार नाही. स्वयंचलित पध्दतीने पाणीपुरवठा सुरू होईल. पाणी किती दाबाने जाईल याची माहिती नियंत्रण कक्षात मिळणार आहे. विजापूर रोड परिसरातील अादित्य नगर पाण्याच्या टाकीवरुन ही चाचणी घेण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी कंपनीकडून काम
स्मार्ट सिटी कंपनी पाणीपुरवठ्यावर खर्च करत आहे. ९० कोटींची केली. त्यातून ही प्रणाली लावण्यात आहे. स्मार्ट सिटी एरियात स्काडा प्रणाली बसवण्यात आली. हद्दवाढ भागात बसवण्यात येत आहे. विजापूर रोडवर बसवण्यात आली असून, त्याची चाचणी पुढील आठवड्यात घेण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.