आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्‍ती भाव:अक्षय्य तृतीयेला तुळजाभवानी मातेस केशर आंब्यांसह टरबुजाची आरास

तुुळजापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय्य तृतीयेनिमित्त मंगळवारी (दि. ३) तुळजाभवानी मातेची विशेष अलंकार पूजा मांडण्यात आली. या वेळी केशर आंब्यासह टरबूज व केळीची आरास मांडण्यात आली. तब्बल दोन वर्षानंतर हजारो भाविकांनी मुहूर्तावर तुळजाभवानी मातेचे निर्बंधांशिवाय दर्शन घेतले. रात्री उशिरा मंगळवारी देवीचा छबिना काढण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक प्रमुख मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभदिनी मंगळवारी सकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला उंची वस्त्र अलंकार घालण्यात येऊन धुपारती नंतर अंगारा काढण्यात आला.

तत्पूर्वी मंगळवारनिमित्त पहाटे १ वाजता चरणतीर्थ पूजा होऊन मंदिर उघडण्यात आले. पहाटे ६ वाजता अभिषेक पूजेची घाट झाली. कोरोना निर्बंधांमुळे यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने केवळ एकच सामूहिक अभिषेक पूजा घालण्यात आली. सायंकाळी अभिषेक पूजेनंतर रात्री उशिरा मंगळवारनिमित्त तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात आला.

यावेळी पुजारी, सेवेकरी, मानकर्यासह मंदिर संस्थान चे अधिकारी कर्मचारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्षय्य तृतीयेनिमित्त तुळजाभवानी मातेला तब्बल २०० केशर आंब्याची आरास करण्यात आली तसेच यावेळी २५ ते ३० टरबूज व केळीच्या दोन फन्यांचा सहयाने आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवीचे हे मनमोहक रूप हजारो भाविकांनी डोळ्यात साठवून ठेवले. यासाठी वेगवेगळ्या भाविकांनी आंबे, टरबूज व केळी उपलब्ध करून देण्यात आली होती.

अक्षय तृतीयेचा विशेष अलंकार
सकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला अक्षय्य तृतीयेनिमित्त नंबर एकच्या डब्यातील विशेष अलंकार घालण्यात आले. सायंकाळच्या अभिषेक पूजेपर्यंत म्हणजे सायंकाळी ७ वाजेपर्यंत तुळजाभवानी मातेची विशेष अलंकार पूजा खुली होती. वर्षभरात गुढीपाडवा, दीपावली पाडवा, महालक्ष्मी, रथसप्तमी आदी मुख्य सनावाराला तुळजाभवानी मातेला विशेष अलंकार घालण्याची प्रथा आहे.

बातम्या आणखी आहेत...