आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:सौभाग्य अलंकाराचा त्याग करणाऱ्या लक्ष्मीबाई पाटील यांचा आदर्श घ्यावा, डॉ अस्मिता बालगावकर यांनी व्यक्त केले मत

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रयत शिक्षण संकुलात लक्ष्मीबाई पाटील पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

लक्ष्मीबाई पाटील यांनी वसतिगृहातील सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना भोजन मिळावे म्हणून सौभाग्य अलंकाराचा त्याग केला. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेची विचारसरणी बळकट झाली. त्यांचे हे योगदान बहुजन समाज कधीही विसरणार नाही. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अस्मिता बालगावकर यांनी व्यक्त केले.

सम्राट चौकातील रावजी सखाराम हायस्कूल व महाविद्यालय, प्राथमिक बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उद्योजिका माधुरी पाटील होत्या. व्यासपीठावर उद्योजक केतन शहा, इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर, प्राचार्य हरिभाऊ ढवळे, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, लालनाथ चव्हाण उपस्थित होते.

माधुरी पाटील म्हणाल्या, लक्ष्मीबाई यांचे माहेर सोलापूर असल्यामुळे त्यांच्या विचारांचे संस्कार पाटील कुटुंबीयांवर झाले आहेत. त्यांच्या विचारसरणीनुसार उद्योग समूहाची वाटचाल सुरू आहे. वंचित, उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. वसंत नागणे यांनी प्रास्ताविक केले. ज्योती चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. संजय जोशी यांनी आभार मानले. सुवर्णमाला आदटराव, राहुल कांबळे, प्रतिभा भोसले, अझहर शेख, महावीर अळंदकर, सुनीता पाटील यांनी प्रयत्न केले.

स्वावलंबी बनवले
डॉ. बालगावकर पुढे म्हणाल्या, लक्ष्मीबाई पाटील यांनी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार केले. त्यामुळे जाती-धर्मांची बंधने नष्ट झाली. त्यांनी कमवा व शिका योजना कृतीत आणली. त्यामुळे विद्यार्थी स्वावलंबी झाले.

बातम्या आणखी आहेत...