आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणुका असो वा नसो, आम्ही कायमच तळागाळातील जनतेची कामे करत राहणार आहाेत, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी पोगुल मळा, रामवाडी येथे “हाथ से हाथ जोडो” अभियानात बाेलताना सांगितले. दुहेरी पाइपलाइनची एक पाइपसुद्धा भाजपवाल्यांनी टाकली नाही. त्यामुळे सोलापूरवासीयांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेचे प्रश्न घेऊन भारत जोडो यात्रा काढली. सोलापूर शहरात हाथ से हाथ जोडो अभियानाद्वारे रेशन, पेन्शन, दाखले मिळवून देणे, मदतकार्य, महागाई, बेरोजगारी, तसेच जनतेच्या कोणत्याही अडचणी असू द्या ते सर्व सोडवणार, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.