आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअन्नधान्यावरही जीएसटी लागू झाल्याने केटरिंग चालकांनी ताटामागे सरासरी १०० रुपयांची वाढ केली. त्यामुळे मर्यादित लाेकांच्या उपस्थितीतच साेहळे हाेऊ लागले. शिवाय वस्त्रे, रुखवतातील वस्तू, मांडव, मंगल कार्यालय भाडे, साेन्याच्या दरातही वाढ झाली. त्यामुळे एकूण साेहळ्यावरचा खर्चच वाढला.
लाॅकडाऊन काळात घरातल्या घरातच लग्न साेहळे झाले हाेते. मंगल कार्यालये, बँड पथक, मंडप कंत्राटदार यांना माेठा फटका सहन करावा लागला हाेता. निर्बंधमुक्त झाल्यानंतर लग्नसराई सुरू झाली, तशी लग्नकार्यातील सर्वच घटकांनी ‘भाव’ खायला सुरुवात केली. डिसेंबरमध्ये सर्वाधिक विवाह मुहूर्त आहेत. रविवारी (ता. ४) शहरात सर्वाधिक साेहळे झाले. प्रत्येक चाैकात वराती हाेत्या. वऱ्हाडींची लगबग हाेती. बँडवाले हाेते. त्यांच्यासमाेर नाचणाऱ्यांमध्ये तरुणाई हाेती, युवतींसह गृहिणींनीही फेर धरला हाेता. एकूणच मर्यादित स्वरूपात हाेते.
महागाईच्या तडाख्यातून सुटले नाहीत रुखवत, सोने, मंगलकार्यालये, बंॅडबाजा १ रुखवतावरही मर्यादा आल्या : रुखवतात इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंसह फर्निचर देण्याचीही प्रथा सुरू झाली. भांडीचे दर स्थिर आहेत. परंतु फ्रीज, एलईडी टीव्हीचे दर वाढले. फर्निचरमध्ये अनेक नव्या गाेष्टी पुढे आल्या. त्याचे दरही अधिक. त्यामुळे रुखवतात देणाऱ्या वस्तूंवरही मर्यादा आल्या. काय पाहिजे, काय नकाे याची चर्चा करूनच वस्तू ठरवल्या जात आहेत.
२ मंगल कार्यालये मेपर्यंत बुक : सर्वच मंगल कार्यालये मे २०२३ पर्यंत फुल्ल आहेत. त्याच्या भाड्यामध्ये जादा वाढ नाही. परंतु मर्यादित लाेकांसाठी कमी बजेटमध्ये संपूर्ण लग्नकार्य करून देण्याच्या याेजना जाहीर झाल्या आहेत. शंभर लाेकांच्या जेवणासह संपूर्ण साेहळ्याचा खर्च एक लाखाच्या आत असलेल्या या याेजना आकर्षित करणाऱ्या आहेत.
३ साेनेदरात चार हजार वाढ : दिवाळीत ५० हजार प्रती ताेळे (१० ग्रॅम) विकले गेलेल्या साेन्याच्या दरात चार हजार रुपयांची वाढ झाली. चांदीच्या दरात ७ हजार रुपयांची वाढ आहे. त्यामुळे रुखवतामध्ये चांदीच्या भांडी, मूर्ती देण्यावरही मर्यादा आल्या. मणी-मंगळसूत्र, जाेडवे, कर्णफुले आदी वस्तूंनाच मागणी असल्याचे सराफ व्यापारी सांगतात.
४ बँडबराेबर बँजाेही वाजताेय : बँड पथकाचे दर स्थिरच आहेत. साेबत बँजाेची मागणी असल्याने त्याचे दर अधिक झाले. नाचणारा घाेडा-घाेडी आणि गायक हवा असेल तर आणखी जादा पैसे माेजावे लागतील. सध्या बँजाे पार्टीला अधिक मागणी आहे. मर्यादित बँड पथक आणि साेबत बँजाे असा पॅकेज घेतल्यास जादा पैसे लागणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.