आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल जाहीर:नीट ; विद्यार्थ्यांचा वाढता टक्का, पवनला 671, तर अनुभव यास मिळाले 656 गुण

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नीट यूजी परीक्षेचा निकाल ऑनलाइन पध्दतीने जाहीर झाला आहे. या परीक्षेच्या गुणांतही वाढ होत आहे. सोलापुरातील लॉजिकच्या पवन नन्ना ६७१ तर बाकलीवाल टिट्युरिअल्सच्या अनुभव पतंगे याने ६५६ गुण पटकावले. फिजिक्स, केमिस्ट्री,बायोलॉजी या विषयांत ७२० गुणांची नीट परीक्षा देशपातळीवर घेण्यात येते. नीट क्वालिफायसाठी सर्वसामान्य संवर्गातील विद्यार्थ्यांना ७१५ ते ११७ दरम्यान गुण असणे आवश्यक आहे. यंदाच्या वर्षी बायोलॉजीचा काठिण्य पातळी सोपी तर फिजिक्सचा विषय त्या तुलनेत अवघड होता.

बाकलीवाल टिट्युरिअल्स यश
येथील बाकलीवाल क्लासेसच्या अनुभव पतंगे याने ६५६ गुण पटकावले. त्याची आॅल इंडिया रँकिंग १०१७ इतकी आहे. आशीर्वाद पाठक ५९९, शाश्वत खंडाळकर ५९४, सोनाली साहू ५७७, रितेश केमशेट्टी ५७५, अनुशृता देशपांडे ५४०, प्रगती पडवळे ५५५ गुण मिळवले. तर ५५० पेक्षा सहा विद्यार्थ्यांनी जास्त गुण मिळवले.

ए.डी. जाेशी काॅलेजचे यश
ए. डी. जोशी ज्युनियर कॉलेजमधून समर्थ सावंत ६३९, खरादी अब्दुरेहमान ६१०, आशीर्वाद पाठक ५९९, पोळ सौरभ ५८९, तर शेख म. जुनैद याने ५७३ गुण पटकावले. ५५० च्या वर ६ , ५०० च्या वर १० आणि ४०० च्या वर १७ विद्यार्थी आहेत. संस्थेचे ए. डी. जोशी, अमोल जोशी, सायली जोशी, प्राचार्य प्रवीण देशपांडे अभिनंदन केले.

लॉजिक इन्स्टिट्यूटचे उत्तम यश
लॉजिस्टिक इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी उत्तम यश पटकाविले. यश मिळवलेले असे विद्यार्थी असे पवन नन्ना ६७१, प्रियंका भटगिरी ५६३, .

संगमेश्वर कॉलेज
संगमेश्वर कॉलेजने नीटमध्ये घवघवीत यश मिळवले. या परीक्षेत रितेश केमशेट्टी याने ५७५ गुण घेत प्रथम क्रमांक मिळवला. प्रियंका बटगिरे ५६३, साक्षी चिंचोळीकर ५११, उत्कर्ष सवाईसर्जे ५०७ आदींना चांगले गुण मिळाले. सर्व गुणवंताचा गौरव केला. यावेळी संस्था सचिव धर्मराज काडादी, उपप्राचार्य प्रसाद कुंटे,रामराव राठोड, उपस्थित होते. सूत्रसंचालन लीना खमितकर यांनी केले.तुकाराम साळुंके यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...