आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक रद्द:मंत्रीच बेशिस्त वागतात तेव्हा... डॉक्टर 5 तास ताटकळले

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नूतन एकनाथ शिंदे सरकारमधील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पहिल्यावहिल्या जिल्हा दौऱ्यात बेशिस्त, बेवक्तशीरपणा दिसून आला. ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सायंकाळी पाच वाजता येणार होते. रात्रीचे साडेदहा झाले तरी मंत्र्यांना राजकीय कार्यक्रमातून वेळ मिळाला नाही. तब्बल पाच तास डॉक्टर, अधिकाऱ्यांना ताटकळत ठेवल्यानंतर बैठक रद्द झाल्याचा निरोप धाडण्यात आला.सिव्हिल प्रशासनाकडून स्वागताची जय्यत तयारी केली होती. सायंकाळी पाच वाजल्यापासून सर्व विभाग प्रमुख, नर्सेस व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. सांवत यांनी जिल्ह्यातील विविध उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयास भेटी दिल्या. त्यानुसार सिव्हिल हॉस्पिटल मध्येही नियोजन केले होते. सिव्हिल प्रशासनाकडून स्टेज तयार करून जंगी सत्काराचेही नियोजन केले होते. सावंत यांच्या स्वागताचे सिव्हिलमध्ये फलक पक्षाकडून लावलेले दिसले. काही नर्सेस विद्यार्थी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी निवेदन घेऊन रस्त्यावरच उभे होते, तर काही आंतरवासिता विद्यार्थी विद्यावेतन व शिष्यवृत्तीची समस्या घेऊन आले होते. त्यांची निराशा झाली.

मंत्री येणार म्हणून दोनदा साफसफाई
आरोग्य मंत्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देणार आहे हे कळल्याबरोबर सिव्हिलकडून वार्डात नर्सेस, सर्व सुविधा, औषधे, स्वच्छता आदी गोष्टीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्वच्छता विभागाकडून दोन वेळा बी ब्लॉकसमोरील स्वच्छता करण्यात आली. मात्र पाच वाजता ड्यूटी संपलेल्या नर्सेस यांना विभाग प्रमुखांच्या आदेशामुळे विनाकारण थांबावे लागले.

बातम्या आणखी आहेत...