आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचा निर्णय अनाकलनीय:26 लाखांची मोजणीची‎ मशीन आहेत तरी कोठे?‎

सोलापूर‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गुंठेवारी जागा मोजणीसाठी तत्कालीन‎ पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सभागृहाची‎ परवानगी न घेता २६ लाख रुपये खर्चून दोन मोजणी‎ मशीन घेतली. त्या मशीनद्वारे शहरातील जागांची‎ मोजणीच होत नसल्याने माजी नरगरसेवक प्रभाकर‎ जामगुंडे यांनी पालिका आयुक्त शीतल तेली यांना‎ सात पानी पत्र धाडले आहे. पत्रात मोजणी मशीनवर‎ श्वेतपत्रिका काढण्यासह अनेक मागण्या केल्या.‎ मिळकतींवर नवीन पद्धतीने कर आकारणी करण्यात‎ येणार आहे. भिंतीक्षेत्र १० ऐवजी १५ टक्के धरण्याचा‎ निर्णय घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस भिंतींची रुंदी‎ कमी होत असताना पालिकेने असा निर्णय का घेतला‎ हे अनाकलनीय आहे.‎

हद्दवाढ भागात एकही प्रसूतिगृह नाही, ते करावे.‎ रस्त्यासाठी निधीची तरतूद हवी. अधिकृत मंडई उभी‎ करावी. जुळे सोलापुरात मनपाच्या मालकीची एकही‎ शाळा नाही. परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू‎ करावी. दोन मोजणी मशीनचा वापर कोठे झाला याची‎ माहिती श्वेतपत्रिका काढून जाहीर करावी. पाच टक्के‎ कर वाढीतून घोटाळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे‎ पालिका आयुक्तांना मी सात पानी पत्र दिले आहे.‎ प्रभाकर जामगुंडे, माजी तज्ञ नगरसेवक‎

बातम्या आणखी आहेत...