आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Arrest Of Education Officer While Accepting Bribe In Solapur Case Motion For Suspension Of Education Officer Sent; Will There Be An Order From The Director?

सोलापुरात लाच घेताना शिक्षणाधिकाऱ्याला अटक प्रकरण:शिक्षणाधिकाऱ्याचा निलंबनाचा प्रस्ताव पाठविला; आदेश निघणार?

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लाच घेतल्यामुळे पोलिसांची कारवाई झाल्यानंतर आता पोलिस कोठडीत गेलेले शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार हा उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

स्वयंअर्थसहाय्य शाळेला वर्ग वाढीसाठी 25 हजाराची लाच घेताना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आले असून त्यांना न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली असून जिल्हा परिषदेमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोहार यांच्या कोल्हापूर येथील घराचे झाडाझडती घेण्यात आली त्यानंतर सापडलेले कागदपत्रावरून त्यांच्या मुंबई आणि सोलापूर येथील फ्लॅट खरे आणि जागांची माहिती घेतली जात आहे, त्यांनी प्रॉपर्टी जमा केल्याचा पुरावा याधाडीमध्ये सापडण्याची कळते.

शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्यांच्यावर स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात देण्यात आले. मंगळवारी त्यांना न्यायालय समोर उभे करण्यात आले. या सर्व बाबींचा अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्या प्रस्तावावर सही करून तो पुणे शिक्षण संचालकाकडे निलंबनासाठी पाठवला असल्याचे समजते. निलंबनाचा आदेश हा संचालकाकडून निघेल.

दरम्यान लोहार यांच्या शिक्षणाधिकारी पदाचा पदभार कुणाकडे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार हा उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती आहे. जावीर यांच्याकडे सध्या महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी पदाचा जादा पदभार आहे.

बातम्या आणखी आहेत...