आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने न्यायालयीन लढ्यासाठी काळजीपूर्वक पावले उचलावीत : संभाजीराजे

करमाळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सत्ताधारी व विरोधक दोघांनी एकत्रित बसून न्यायालयीन लढाई लढली तर नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळेल

मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मागील सरकारने आरक्षण दिले होते. पण हे आरक्षण सर्वोच्च न्यायालय टिकले नाही. आता इथून पुढे तरी सरकारने न्यायालयीन लढ्यासाठी काळजीपूर्वक पावले उचलावीत, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी करमाळ्यात पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, न्यायालयीन लढ्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित बसून चांगल्या पद्धतीची तयारी करून जास्त तयारीच्या वकिलांची फौज न्यायालयात उभी केली पाहिजे. आरक्षणाचे राजकारण होता कामा नये. सत्ताधारी व विरोधक दोघांनी एकत्रित बसून याचा अभ्यास करून न्यायालयीन लढाई लढली तर नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळेल. समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कामकाजावर आम्ही समाधानी असलो तरी मराठा समाजाचे आरक्षण अजून मिळत नाही. आता मराठा समाजाचा संयम सुटत आलेला आहे. यामुळे सत्ताधारी व विरोधक या दोघांनी मिळून हा प्रश्न सोडवावा.

शाहू महाराज, डॉ. आंबेडकरांचा इतिहास मांडावा

आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण देताना अठरापगड बारा बलुतेदार जाती मागासवर्गीय सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले. त्याचबरोबर मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिले. छत्रपती शाहू महाराजांना आदर्श मानून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची मांडणी केली. आता पत्रकारांनी छत्रपती शाहू महाराजांचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वारंवार आपल्या लेखणीतून वाचकांपुढे नेला तर निश्चितच समाजात प्रगल्भता येऊन एकमेकांबद्दल प्रेम वाढेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser