आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढऱ्या रंगाचा खोकड आढळला:सोलापुरात आढळला पांढऱ्या रंगाचा खोकड, भारतात पहिलीच नोंद

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट तालुक्यातील माळरानावर काही दिवसांपूर्वी पांढऱ्या रंगाचा खोकड (Indian Fox) आढळला. वन्यजीव अभ्यासकांच्या मते ही भारतातील पहिलीच नोंद आहे. सोलापूर जिल्ह्यात विविध वन्यप्राणी आढळतात. यामध्ये लांडगा, कोल्हा तसेच खोकड अशा प्राण्यांचा वावर आहे. अक्कलकोट तालुक्यातील माळरानावर अतिशय दुर्मिळ लुसिस्टिक खोकड पहिल्यांदाच आढळला आहे, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी दिली.

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे. हा राखाडी तांबूस रंगाचा असतो. पण, या वर्षी निरीक्षण करताना येथील वॉइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशनचे हिरेमठ यांना पांढऱ्या रंगाचा खोकड आढळला. त्यांनी छायाचित्र काढले आहेत. या प्रकारच्या जनुकीय बदलाच्या अवस्थेला ल्युसिस्टिक असे म्हटले जाते. या अवस्थेत काही अंशी रंगद्रव्ये शरीरावर उपस्थित नसतात. ल्युसिस्टिक असलेला हा खोकड संपूर्णतः पांढरा असून शेपटीच्या टोकास काळा रंग दिसून आला. यापूर्वी ल्युसिस्टिक रानमांजर व कोल्ह्याची नोंद झाली होती, पण पांढऱ्या खोकडची ही भारतातील पहिलीच नोंद आहे.

असा असतो खोकड..
खोकड हा कोल्ह्यापेक्षा लहान असून लांबी ५० ते ६० सेंटिमीटर इतकी असते. शरीराचा रंग राखाडी, तांबूस असतो. दिसायला सडपातळ आणि लांब झुपकेदार शेपटीमुळे खोकड सहज ओळखता येतो. हा प्राणी जमिनीत, बांधावर किंवा लहानशा टेकडीवर बीळ करून राहतात. सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी, कीटक, बोरं आणि छोटे पक्षी हे त्यांचे प्रमुख खाद्य असते. उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवत असल्याने हा प्राणी शेतकऱ्यांचा मित्र आहे.

खवले विरहीत नाग आढळला
गेल्या वर्षी सोलापूर शहरामध्ये खवलेविरहीत नाग आढळला होता. चार वर्षांपूर्वीही त्याच पद्धतीचा नाग आढळला होता. त्यासंदर्भातील माहितीचा सर्पमित्र राहुल शिंदे यांचा शोध प्रबंध अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वन्यजीवविषयक माहिती नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाली होती. सहा महिन्यांपूर्वी अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी शिवारात एक रोगविरहित सात-भाई पक्षी वन्यजीव अभ्यासक हिरेमठ यांना आढळला होता.

बातम्या आणखी आहेत...