आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाेलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन (विव्हकाे प्राेसेसच्या)ची संपूर्ण जमिनी विकण्याचे अधिकार अध्यक्ष आणि प्रभारी व्यवस्थापक यांना काेणी दिले? विक्री किमतीस नागपूरच्या वस्त्राेद्याेग संचालकांची मंजुरी नसताना जागेचे हस्तांतर कसे झाले?
असे गंभीर प्रश्न चाैकशी अधिकाऱ्यांनी उपस्थित केले आहेत. फेडरेशनच्या न्यू पाच्छा पेठेतील (सिटी सर्व्हे क्रमांक १०४३४, प्लाॅट क्रमांक २८-ब) जमीन विक्रीप्रकरणी सहकारी संस्थांचे विशेष लेखापरीक्षक पी. ए. मुंडे यांनी हा अहवाल दिला.
ताे वस्त्राेद्याेग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त चंद्रकांत टिकुळे यांना नुकताच सादर केला. त्यात अनेक प्रश्न उपस्थित केले. जमीन विक्रीसाठी नियंत्रण समिती गठित करण्यात आली हाेती. परंतु या समितीने जागा विक्रीबाबत काय निर्णय घेतला? नागपूरच्या आयुक्तांना काय अहवाल पाठवला? याची माहिती उपलब्ध झालेली नाही. मुळात आयुक्तांच्या (नागपूर) पूर्वपरवानगीशिवाय जमिनीची विक्री करताच येत नाही. या अटीचेही उल्लंघन झाले, असे नमूद करून त्यांनी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या नियंत्रण समितीच्या कार्यशैलीवरच बाेट ठेवले आहे.
अहवालातील चार गंभीर मुद्दे
खरेदी दस्तवर दिनांक ३१ मार्च २०२१ असे नमूद आहे. त्यावर खाडाखाेड आहे. प्रत्यक्ष खरेदी ५ आॅगस्ट २०२१ राेजी झाली.
८७ हजार १५६ चाैरस फूटपैकी १८ हजार चाै.फू. जागा विक्रीला परवानगी हाेती. संपूर्ण क्षेत्र विकण्याचे अधिकार काेणी दिले?
विक्रीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतून जाहिरात द्यावी, अशी अट आहे. इंग्रजीतून प्रसिद्ध झाली. परंतु काेणत्या देनिकातून?
विक्री किमतीस नागपूरच्या आयुक्तांची मंजुरी मिळाल्याशिवाय जागेचे हस्तांतर करता येणार नाही, या अटीचे उल्लंघन झाले.
अहवाल मिळाला आता पुढील कारवाई करणार
लेखापरीक्षकांचा चाैकशी अहवाल मिळाला. पुढील कारवाईसाठी सरकारी वकिलांचा अभिप्राय घ्यावा लागेल. त्यानंतर दाेषींवर कायदेशीर कारवाई हाेईल.”-चंद्रकांत टिकुळे, प्रादेशिक उपायुक्त (वस्त्राेद्याेग)
यंत्रणेच्या संगनमतानेच झाले विक्रीतील घाेटाळे
जमीन विक्रीसाठी अधिकाऱ्यांची नियंत्रण समिती असताना घाेटाळा म्हणजे अधिकाऱ्यांशी असलेली संगनमत आहे. दस्तनाेंदणी रद्द करावी, अशी मागणी केली.”-डाॅ. गाेवर्धन सुंचू, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.