आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:विधवा शिक्षिकेवर दुष्कर्म, शिक्षकावर गुन्हा दाखल

बार्शी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बार्शीत आठ महिन्यांपासूनचा प्रकार

पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देऊन एका विधवा शिक्षिकेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी शिक्षकावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने फिर्याद दिली आहे. विकी लक्ष्मण जाधव (रा. वाणी प्लॉट, आगळगाव रोड, बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. जून २०२१ ते ८ मार्च रोजी रात्री ११.३० या कालावधीत पीडिता भाड्याने राहत असलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. दरम्यान, संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिलेचे पती आजाराने २०२० मध्ये मयत झाल्यानंतर पीडिता आईसोबत माहेरी राहत होती. पीडितेच्या पतीचे व येथील एका विद्यालयात शिक्षक असलेल्या विकी जाधव याचे मैत्रीचे संबंध होते. पीडितेशी त्याची ओळख होती. वैयक्तिक अडचणींची विकीस माहिती होती. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन तो पीडितेसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता. जून २०२१ मध्ये पीडिता शहरातील एका सदनिकेत भाड्याने राहत असताना तो तिच्या घरी गेला. तिच्या ५ वर्षीय मुलीचे अपरहण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पीडितेसोबत जबरदस्तीने दुष्कर्म केले. त्यावेळी पीडितेने तिचा व तिच्या मुलीच्या भविष्याचा विचार तक्रार केली नाही. त्यानंतरही तिच्या अगतिकतेचा फायदा घेऊन तो धमकी देऊन दुष्कर्म करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडिता डिसेंबर २०२१ मध्ये आईसोबत राहण्यासाठी माहेरी गेली. जाधव याच्यासोबतचा संपर्क पूर्णपणे बंद केला होता. यामुळे विकी चिडला होता. तो रात्री अपरात्री फोन करून पीडितेस असभ्य भाषेत दमदाटी करत होता.

त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये पीडिता शहरात दुसरीकडे खोली भाड्याने करून मुलीसोबत राहत होती. ८ मार्च रोजी रात्री ९.३० च्या सुमारास तो तेथे गेला. तू माझ्यासोबत रखेल म्हणून राहा, नाहीतर मी तुझी बदनामी करून तुला जगू देणार नाही, अशी दमदाटी केली. रात्री ११.३० च्या सुमारास पीडीतेसोबत बळजबरीने दुष्कर्म केले. पीडिता तिला विरोध करताना त्याने तिला हाताने, लाथाबुक्कयाने मारहाण केली. नेहमी होणाऱ्या त्रासामुळे तिने पोलिसांत तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक सारिका गटकुळ तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...