आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा:पत्नीने प्रियकरासह रचला खुनाचा कट

साेलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगाई केकडेनगरात दशरथ नागनाथ नारायणकर (३५) या युवकाच्या बुधवारी झालेल्या खुनातील मारेकऱ्यांना पाेलिसांनी फक्त २४ तासांत जेरबंद केले. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे समोर आले. बाबासाहेब जालिंदर बाळशंकर (२७) व दशरथची पत्नी अरुणा नारायणकर (२९) यांना पोलिसांनी अटक केली. माहितीनुसार, गेल्या सात-आठ वर्षांपासून अरुणा व बाबासाहेब त्यांच्यातील प्रेमसंबधाची माहिती असणाऱ्यांनी पाेलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. आरोपीच्या व्हाॅट्सअॅपवर अरुणाशी खुनाबाबत केलेल्या चॅटिंग केलेला मजकूर मिळाला.

बातम्या आणखी आहेत...