आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढा (सोलापुर):प्लॉट नावावर करुन देण्याची मागणी अन् चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या, नवऱ्यासह सासु सासऱ्यावर गुन्हा दाखल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्लॉट नावावर करुन देण्याची मागणी अन् पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने पत्नीची गळा दाबुन हत्या केल्याची धक्कादायक घटना माढ्यातील शुक्रवार पेठेतील मोमीन गल्लीत शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. त्यांना सहा वर्षांचा मुलगा अन् तीन वर्षाच्या मुलगी आहे.

सना इरफान मोमीन (वय 27)असं खुन झालेल्या विवाहितेचे नाव आहे. माढा पोलिसांत विवाहितेचे वडील महंमदमुसा गुलामदस्तगीर अन्सारी(वय 52 रा.उस्मानाबाद)यांनी फिर्याद दिल्यानुसार पती इरफान रजाक मोमीन, सासरा रजाक मकबुल मोमीन, सासु आसिया रजाक मोमिन या तिघांवर माढा पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. पती व सासऱ्यास माढा पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली आहे.

पती इरफानने माढा पोलिसांसमोर गुन्ह्याचा उलगडा केला आहे. मयत सना हिचे लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांनी तिला नवरा, सासु व सासऱ्यांनी तुझ्या आई वडिलांनी लग्नामध्ये काही दिले नाही. मान पान दिला नाही असे म्हणत उस्मानाबाद येथे असलेला प्लॉट माझ्या नावावर कर यावरुन मारहाण केली. त्याच बरोबर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत मारहाण करत शारिरिक मानसिक छळ सुरु होता. यामधुनच पती इरफान मोमिन याने गळा दाबुन ठार मारले.अशी फिर्याद विवाहीतेच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोगडे करीत आहेत.

विवाहितेला शुक्रवारी रात्री दवाखान्यात दाखल करण्यात आले, शवविच्छेदन शनिवारी अकरा वाजता- विवाहितेला शुक्रवारी रात्री माढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डाॅ.बोबडे यांनी उपचारापुर्वीच ती मयत असल्याचे जाहीर केले. मात्र विवाहितेच्या माहेरच्या मंडळीनी प्रेत राखुन ठेवत. सासरच्या मंडळिवर गुन्हा दाखल केल्यानंतरच शनिवारी सकाळी 11 वाजता शवविच्छेदन पार पडले.

बातम्या आणखी आहेत...