आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Will I Read In Those 45 Minutes? There Was No Such Question; Assam Superintendent Of Police Nimbalkar Said The Thrilling Mantra Of Success| MARATHI NEWS

मी यशस्वी हाेणारच:त्या ४५ मिनिटांमध्ये मी वाचेन का? असा प्रश्नच पडला नाही; आसाममधील पोलिस अधीक्षक निंबाळकरांनी सांगितला यशस्वितेचा थरारक मंत्र

साेलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाम-मिझोरामच्या सीमा संघर्षातील गोळीबारात गंभीर जखमी झालेले पोलिस अधीक्षक वैभव निंबाळकर यांनी तो प्रसंग पुन्हा एकदा सोलापूरच्या युवकांसमोर ठेवला. रविवारी यशस्वितेचा थरारक मंत्र सांगताना ते म्हणाले, “कुठल्याही प्रसंगात मनाची स्थिरता अन् खंबीरपणा या महत्त्वाच्या बाबी आहेत. या बाबींमुळेच आसाममधील त्या ४५ मिनिटांत ‘मी वाचेन का?’ असा प्रश्नच पडला नाही. पायाला गोळी लागली म्हणूनही मागे हटलाे नाही.”

जीवन विद्या मिशन या संस्थेच्या वतीने आयोजित ‘मी यशस्वी होणारच’ या विषयावर ते बोलत होते. त्यांना ऐकण्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिर खचाखच भरले होते. बाहेर उन्हात ऐकत बसणाऱ्यांमध्ये पोलिसांची संख्या अधिक होती.

बाह्यमनातून अंतर्मनात ध्येय बिंबवा,खंबीर मनाने पुढे जा, यश निश्चित!
बाह्यमन चंचल असते तर अंतर्मन खंबीर. त्यामुळे ठरवलेले ध्येय बाह्यमनातून अंतर्मनात बिंबवा. खंबीर मनाने पुढे जा. निश्चित यश मिळवाल, असा मंत्र आसाम येथील कछर जिल्ह्याचे पाेलिस अधीक्षक वैभव निंबाळकर यांनी येथे दिला. जीवन विद्या मिशन आयाेजित ‘मी यशस्वी हाेणारच’ या विषयावरील व्याख्यानात ते बाेलत हाेते. ते मूळचे पुण्याचे. २००९ च्या आयपीएस बॅचचे सर्वात तरुण अधिकारी. आसाम केडर मिळाल्यापासून आजपर्यंत आसाममध्येच कार्यरत. यशस्वी हाेण्यासाठी त्यांनी अनेक गाेष्टी सांगितल्या.

संकटांत डळमळीत होऊ नका..
अंतर्मनात प्रचंड ताकद असते. त्याच्या कप्प्यात ध्येय निश्चित झाले, की अर्जुनाला जसा पाेपटाचा डाेळाच दिसला, त्या पद्धतीने ध्येयच दिसेल.मनाची स्थिरता आणि खंबीरता या गाेष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कुठल्याही संकटात या गाेष्टी डळमळीत हाेता कामा नये. मागे हटायचे नाही.प्रयत्न ही एक अशी गाेष्ट आहे. जी देवासकट मिळवता येते. त्यामुळे कुठलीही गाेष्ट दैवी इच्छेवर साेडू नका.

बातम्या आणखी आहेत...