आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्कलकाेट रस्त्यावरील आैद्याेगिक वसाहतीत २५ काेटी रुपयांचे अंतर्गत रस्ते करण्यासाठी स्वत: एमआयडीसीने पुढाकार घेतला. त्यासाठी महापालिकेने फक्त ‘आमच्याकडे पैसे नाहीत’ अशा आशयाचे पत्र देण्याचा विषय आहे. त्याला महिना हाेत आला तरी महापालिकेकडून पत्र मिळाले नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमाेर हा विषय आला. त्यावेळी आयुक्त शीतल तेली यांचा प्रश्न- ‘एमआयडीसी रस्ते करणार नंतर महापालिकेकडून पैसे घेणार, हे काही पटण्यासारखे नाही.
माझी काही हरकत नाही. पण, तुम्ही ठरवा...’ त्यावर आमदार सुभाष देशमुख आणि अक्कलकाेटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उत्तर दिले, ‘‘करतात तर करू द्या ना मॅडम. जेव्हा पैसे द्यायचे तेव्हा पाहू...’’ अक्कलकाेट रस्त्यावरील आैद्याेगिक वसाहतीतल्या सुविधांबाबत सध्या एमआयडीसी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये टाेलवाटाेलवी सुरू आहे. विशेष म्हणजे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत दाेन्हीकडून महिला अधिकारी आहेत. परंतु त्यांच्यात सुसंवाद नाही. मंत्र्यांसमाेर चर्चा हाेऊनही त्याचा अंमल हाेत नाही.
उद्याेगमंत्र्यांनी ताेडगा काढला होता, पुन्हा पालकमंत्र्यांसमाेर चर्चा परंतु निष्फळच
उद्याेजक म्हणाले, ‘‘आतापर्यंत जेवढा कर भरला, त्या प्रमाणात सुविधा देण्यावर किती खर्च केला?’’ कारंजे यांच्याकडे उत्तर नव्हते. हा प्रकार पाहून श्री. सामंत कारंजे यांना म्हणाले, ‘‘एमआयडीसी अंतर्गत रस्ते करणार. महापालिकेकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा घेणार. तुमची काही हरकत नसेल तर ‘निधी नाही म्हणून रस्ते करणार नाही’ असे पत्र लिहून द्या. आताच द्या.’’ त्यावर श्री. कारंजे यांनी मान हलवली. त्याला २२ दिवस झाले तरी एमआयडीसीला पत्र दिले नाही.
राज्याचे उद्याेगमंत्री उदय सामंत ११ फेब्रुवारीला साेलापुरात हाेते. त्यांच्या उपस्थितीत नियाेजन भवनमध्ये उद्याेजकांची बैठक झाली. त्या वेळी आगीच्या घटना आणि अंतर्गत रस्त्यांचा विषय हाेता. त्याला आयुक्त तेली नव्हत्या. त्यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हाेते. त्यांना श्री. सामंत यांनी रस्त्यांविषयी विचारणा केली. त्यावर कारंजेंकडून उत्तर मिळाले, ‘‘उद्याेजक मिळकत कर भरत नाहीत. बरीच रक्कम थकित आहे.’’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.