आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत पुस्तके‎:नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत‎ करण्यासाठी पाठपुरावा करणार : शिंदे‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर‎ पहिली ते आठ वी मोफत शिक्षण‎ आहे. पण खऱ्या अर्थाने‎ आठवीनंतर शिक्षणाची ओढाताण‎ होते तेव्हा खऱ्या अर्थाने शासनाने‎ मदत केली पाहिजे म्हणून काँग्रेस‎ पक्षाने परवा झालेल्या शिर्डी येथील‎ नवसंकल्प शिबिरात नववी ते‎ बारावी मोफत शिक्षण देण्याचे‎ धोरण मांडले. ते लागू होण्यासाठी‎ पाठपुरावा करणार आहे. आज‎ त्याची सुरुवात विनोद भोसले यांनी‎ मोफत पाठ्यपुस्तके वाटप‎ कार्यक्रमाच्या माध्यमातून केली‎ आहे असे प्रतिपादन आमदार‎ प्रणिती शिंदे यांनी केले.‎ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या‎ स्मृती शताब्दीचे औचित्य साधून‎ धर्मा भोसले सोशल फाउंडेशनच्या‎ वतीने विनोद भोसले यांनी सोपूर‎ शहरातील विविध शाळांतील‎ आठवी व नववीमधील १००‎ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके‎ वाटप करण्यात आली.‎ या वेळी आमदार शिंदे बोलत‎ होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी‎ होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.‎ रावसाहेब पाटील, सोलापूर‎ विद्यापीठाचे उपकुलसचिव शिवाजी‎ शिंदे, मराठा क्रांती मोर्चाचे‎ समन्वयक माउली पवार, पद्मशाली‎ ज्ञाती संस्थेचे सचिव सुरेश‎ फलमारी, शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष‎ मनोज यलगुलवार, आशुतोष‎ तोंडसे, अंबादास करगुळे, गणेश‎ डोंगरे, समीर शेख, वाहिद बिजापुरे,‎ तिरुपती परकीपंडला, प्रवीण‎ जाधव, रुपेश गायकवाड, दाऊद‎ नदाफ, युवराज जाधव, दीनानाथ‎ शेळके, विवेक कन्ना, संजय‎ गायकवाड, श्रीकांत वाडेकर,‎ बाबूराव क्षीरसागर, शुभम माने,‎ सुभाष वाघमारे, एजाज बागवान,‎ राजेंद्र शिरकुल आदी उपस्थित होते.‎ या वेळी तसेच अविनाश कुलकर्णी,‎ डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले.‎ अखिलेश देशपांडे, शुभम परदेशी,‎ सचिन हचदड व पदाधिकारी‎ कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.‎

बातम्या आणखी आहेत...